महाराष्ट्र

‘पहिली बेटी धनकी पेटी, दुसरी बेटी तुप की रोटी’ | लवंग येथे दुसऱ्या मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत

जन्माला आलेल्या दुसऱ्या लेकीचे स्वागत

लवंग येथे दुसऱ्या मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत

अकलूज दि.9 (केदार लोहकरे) अनेकदा घरात मुलगी जन्माला आली, की पालक निराश झाल्याचे चित्र दिसून येते.’मुलगी परक्याचे धन’ असा विचार रुजलेल्या समाजात आता मानसिकता बदलल्याचे चित्र  लवंग गावातील प्रमोद अनिता- भास्कर भोसले यांनी आपल्या  दुसऱ्या  मुलीच्या जन्माचे अनोखे व दिमाखदार स्वागत करीत दाखवून दिले आहे.

लवंग (ता.माळशिरस) येथील जेमतेम आठवी  शिक्षण झालेल्या  प्रमोद भोसले व निकिता भोसले या  दाम्पत्यास प्रणाली नावाची पहिली मुलगी आहे.दुसरी देखील  मुलगी झाल्याने हॉस्पिटल मधून मुलगी घरी घेऊन येताना ढोल -ताशा,फटाक्यांची आतिषबाजी व आकर्षक रांगोळी काढून दुस-या मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करण्यात आले.

लक्ष्मी आली घरा – मायलेकीच्या स्वागतासाठी चार चाकी गाडी फुलांनी सजवली होती.घरामध्ये प्रवेश करताना फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या.भली मोठी नक्षीदार रांगोळी काढून घराचा परिसर सजवण्यात आला होता. ज्या घरी मुलगी जन्माला आली त्या घरी लक्ष्मी आली हा संदेश देखील लिहिला होता.घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधले,यावेळी सासूबाई व धाकल्या जाऊबाईंनी औक्षण करून मायलेकींचे घरात स्वागत केले. गावात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.पहिली  मुलगी प्रणाली भोसलेच्या  शिक्षण व लग्नासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या योजनेतही ते महिन्याला दीड हजार बचत करत आहेत.

‘पहिली बेटी धनकी पेटी, दुसरी बेटी तुप की रोटी’ असे सांगून घरात जन्माला येणाऱ्या लेकीचे स्वागत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीने घालून दिली आहे,याला अधिक सशक्त करण्याचे व हा  विचार रुजवण्यासाठी भोसले कुटुंबियांनी टाकलेले पाऊल हजारो पालकांची मानसिकता बदलण्यासाठी आदर्शवत आहे.

मातृशक्तीचा सन्मान : “आपल्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागत जितक्या श्रद्धेने आणि निष्ठेने गौरीचे पूजन करतो, तितक्याच श्रद्धेने आणि अंतकरणाने केल्यास प्रत्येक दिवस हा गौरी पूजनाचा असेल. भोसले कुटुंबीयांनी मातृशक्तीचा आदर करीत,या मायलेकीचे केलेले स्वागत, लवंग गावासाठी अभिमानास्पद आहे.”- लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील लवंग (ता माळशिरस)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!