महाराष्ट्र

तरुणांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवण्यावर सारथी कार्यक्रमाचा भर 

सारथीच्या कौशल्या विकासातून स्वयंरोजगाराचा मार्ग –अशोक काकडे (IAS)

श्रीपूर: महाराष्ट्रातल्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी, त्यांची रोजगार क्षमता आणि स्वयंरोजगाराची क्षमता वाढवण्यासाठी सारथी व एमकेसीएलच्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्राम  द्वारे राबविण्यात आलेला सारथी कार्यक्रम हा महत्त्वाचा आहे. असे सारथीचे कार्यकारी संचालक अशोक काकडे (IAS) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते 

माळशिरस तालुक्यामध्ये लोणकर कॉम्प्युटर अकलूज येथे सारथीच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर कोर्सचे प्रशिक्षण राबवले जात आहेत याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यावेळेस माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थी त्यांचे चाललेल्या कोर्सची पाहणी केली महाराष्ट्र राज्यातील लक्ष्य गटांना (मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा) 21 व्या शतकातील रोजगार-तत्परता कौशल्ये, क्षमता आणि चारित्र्य वैशिष्ट्ये प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेमध्ये उदयोन्मुख संधींसाठी तरुणांना तयार करून रोजगारक्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवण्यावर सारथी या कार्यक्रमाचा भर आहे. विविध नोकरी-विशिष्ट डिजिटल कौशल्ये, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्समध्ये प्रभुत्व मिळवून हे साध्य केले जाते.

कौशल्य विकास महत्त्वपूर्ण आहे. कौशल्यातील अंतर भरून काढणे, 21 व्या शतकातील डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत कुशल मनुष्यबळाची सतत वाढणारी बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणे आणि सांस्कृतिक आचारसंहितेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 

मोफत प्रशिक्षण : 

“सारथी ने राज्यव्यापी स्तरावर CSMS-DEEP च्या मिशन-मोड लाँचची सुरुवात केली आहे. हे विविध प्रकारच्या स्मार्ट वापरकर्ता-स्तरीय डिजिटल कौशल्यांवर प्रभुत्व मिळवून आणि 21 व्या शतकातील भौतिक आणि आभासी कार्यस्थळांसाठी आवश्यक उद्योजकीय मानसिकता आणि चारित्र्य वैशिष्ट्ये विकसित करून केले जाते.हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. “-अशोक काकडे (IAS)-कार्यकारी संचालक, सारथी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!