श्रीपूर मध्ये 41 रक्तदात्यांनी केले रक्तदान | डॉ. सुहास बनसोडे यांनी राबविला उपक्रम
डॉ. सुहास बनसोडे यांनी केले होते रक्तदान शिबिराचे आयोजन

सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
श्रीपूर प्रतिनिधी : श्रीपूर तालुका माळशिरस येथे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती श्रीपूर परिसरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. श्रीपूर मधील डॉ.सुहास बनसोडे यांनी राजा शिवछत्रपती परिवार सोलापूर, हर्ष फाउंडेशन आणि गुलाब मामा बनसोडे वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 41 रक्तदात्याने रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले, यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन रामचंद्र सावंत-पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी व्हा चेअरमन अँड प्रकाशराव पाटील, महाळुंग श्रीपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, महाळुंग श्रीपूर नगरपंचायत गटनेते राहुल रेडे-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य अरुण तोडकर, पैलवान अशोक चव्हाण, नगरसेवक नामदेव इंगळे, नगरसेवक रतनसिंह राजपूत, प्रमुख वक्ते अँड अविनाश काले, मौला पठाण, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाळेकर, आरपीआय चे नेते शामराव भोसले, ए एस आय बाळासाहेब पानसरे, तुकाराम बाबर, अण्णा जाधव , डॉ.सुहास बनसोडे, पत्रकार B T शिवशरण, विजय झरकर, तेजस रेडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.सुहास बनसोडे हे गेले अनेक वर्षापासून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. गरजू होतकरू विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, रक्तदान शिबिर, खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, असे वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.