महाराष्ट्र
धैर्यशील मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल

43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील उपस्थित होते.
नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या ते तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत. आज प्रचाराचा नारळ फुटून, प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.