श्रीपूर | इम्रान शेख | माळशिरस तालुक्यात उद्योग–व्यापार विभागाच्या तालुकाध्यक्षपदी
इम्रान शेख यांची NCP(SP) उद्योग–व्यापार तालुकाध्यक्षपदी निवड; विकासावर केंद्रित भूमिका

उद्योजक आणि व्यावसायिकांना नवा आवाज; इम्रान शेख यांच्यावर (श.प.) राष्ट्रवादीची जबाबदारी
माळशिरस तालुक्यात (शरदचंद्र पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार विभागाच्या तालुकाध्यक्षपदी इम्रान शेख नियुक्त
अकलूज दि.15.11.2025 (संपादक दत्ता नाईकनवरे -इनमहाराष्ट्र न्यूज)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) उद्योग व व्यापार विभागाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी श्रीपूर येथील इम्रान अब्दुलकादर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच उद्योजक व व्यावसायिक वर्गाला केंद्रस्थानी ठेवून प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी कर्तृत्ववान, समाजसेवक, कार्यक्षम आणि जनसंपर्कात पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
इम्रान शेख यांनी माळशिरस तालुक्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रलंबित आणि स्थानिक स्तरावरील समस्यांना प्राधान्य देण्याबरोबरच उद्योजकांचे सक्षमीकरण, युवकांना उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे तसेच विभागाचे जाळे ग्रामीण भागापर्यंत अधिक सक्षम करण्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि उद्योजक वर्गाकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



