डिजिटल भारताचे मार्गदर्शक : मंदार आगाशे
सर्वत्रा' च्या यशामुळे, भारताचे डिजिटल चलन आणि UPI मॉडेल आता जगभरात आदर्श

‘सर्वत्रा (Sarvatra) फिनटेक क्रांती मधील २५ वर्षांची यशस्वी व महत्त्वपूर्ण वाटचाल
इन महाराष्ट्र न्यूज | संपादक – दत्ता नाईकनवरे
मंदार आगाशे यांनी स्थापन केलेली सर्वत्रा (Sarvatra) ही भारतातील पहिली फिनटेक कंपनी आहे. या कंपनीने ग्रामीण भागातून आपले कार्य सुरू केले आणि नंतर शहरी भागाकडे विस्तार केला. ‘सर्वत्रा’ च्या यशामुळे, भारताचे डिजिटल चलन आणि UPI मॉडेल आता जगभरात आदर्श म्हणून पाहिले जात आहे.
“मंदार आगाशे आणि ‘सर्वत्रा’: ग्रामीण डिजिटायझेशन आणि फिनटेक क्रांतीचे मार्गदर्शक”
मंदार आगाशे यांच्या ‘सर्वत्रा’ या कंपनीने भारतातील ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकिंगची क्रांती घडवली आहे. ‘सर्वत्रा’ ने, “कुठेही केव्हाही पैसा” या संकल्पनेला आकार देत, भारताच्या डिजिटायझेशनची मूळं ग्रामीण भागात तयार केली आहे. फिनटेक क्षेत्रातील या नवप्रवर्तकांनी ‘एनीवेअर मनी’ संकल्पनेची कल्पना राबवली आणि एका दृष्टीकोनातून भारताला डिजिटल पेमेंट आणि बँकिंगमध्ये आघाडीवर आणले. ‘सर्वत्रा’ ने उपयुक्त सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भारतात डिजिटायझेशन सुलभ आणि किफायतशीर केले आहे, ज्यामुळे देशभरात डिजिटल पेमेंटचा विस्तार होण्यास मदत झाली.
मंदार आगाशे यांच्या समांतर उद्योजकतेच्या दृष्टिकोनामुळे त्यांना विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवता आले. त्यांनी एकाच वेळी फिनटेक, संगीत आणि नैसर्गिक उत्पादन क्षेत्रात व्यवसाय वाढवले. ‘सर्वत्रा’ कंपनीने G20 परिषदे दरम्यान UPI च्या यशस्वी प्रदर्शनामुळे भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीला जागतिक ओळख दिली आहे.
स्मार्टफोन वापराने आणि क्यूआर कोडच्या सुलभतेने भारतात डिजिटायझेशनला वेग दिला आहे. ‘सर्वत्रा’ च्या यशामुळे, भारताचे डिजिटल चलन आणि UPI मॉडेल आता जगभरात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. मंदार आगाशे यांच्या नेतृत्वाखाली, भारताने ‘मेक इन इंडिया’ संकल्पना यशस्वी केली असून, हा डिजिटल व्यवसाय जागतिक (वैश्विक) पातळीवर पोहोचला आहे.
अशा पद्धतीने, मंदार आगाशे आणि ‘सर्वत्रा’ च्या कार्याने भारताच्या डिजिटायझेशन प्रक्रियेला एक नविन दिशा दिली आहे, आणि त्यांचे योगदान फिनटेक क्षेत्रामध्ये अनमोल ठरले आहे.
भारतातील सर्वात जुन्या फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘सर्वत्र टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे हे आहेत. भारतातील डिजिटल परिवर्तनात आपल्या कंपनीच्या २५ वर्षांच्या योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमात UPI, RuPay यांसारख्या प्लॅटफॉर्मना बळकटी देण्यासाठी बजावलेल्या भूमिका पुढील प्रमाणे आहेत.
‘कुठेही, केव्हाही पैसा’ या संकल्पनेतून ‘सर्वत्र’ (Sarvatra) चा आरंभ
कंपनीचे संस्थापक मंदार आगाशे यांनी त्यांच्या ग्रामीण भागातील अनुभवातून ‘कुठेही, केव्हाही पैसा’ (Anywhere Money) या संकल्पनेचा विचार केला. त्या वेळी भारतात केवळ ५३ बँकांकडेच डेबिट कार्ड जारी करण्याची क्षमता होती. ‘सर्वत्र’ हा संस्कृत शब्द ‘सर्व ठिकाणी’ या अर्थाने वापरला गेला आणि तिथूनच या डिजिटल प्रवासाची सुरुवात झाली.
UPI आणि G20 शिखर परिषदेतून भारताचा जागतिक ठसा
आज UPI भारतात इतका सहज आणि सर्वव्यापी झाला आहे की, विक्रेते देखील रोख रक्कम बाळगत नाहीत. आगाशे यांच्या ‘सर्वत्र’ कंपनीने G20 शिखर परिषदेसाठी UPI व्यवहारांना तांत्रिक पाठबळ दिले. परदेशी प्रतिनिधींनी भारतात आल्यावर विमानतळावरच UPI ॲप डाउनलोड करून परकीय चलनातून व्यवहार सुरू केले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींसह सर्वजण प्रभावित झाले.
आर्थिक समावेशकतेतून GDP वाढीस चालना
डिजिटल व्यवहार थेट खात्यातून खात्यात होतात, त्यामुळे पैशाची औपचारिक बँकिंग प्रणालीत उपस्थिती वाढते. याचा थेट परिणाम देशाच्या GDP वर होतो. ही प्रणाली पारंपरिक एटीएम व्यवहारांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
परवडणारे आणि सहज डिजिटायझेशन
फक्त १०-१२ रुपयांच्या QR कोडमुळे संपूर्ण दुकान डिजिटल होते, जिथे POS मशीनसाठी १०-१२ हजार रुपये खर्च येतो. हे तंत्रज्ञान परवडणारे आणि सर्वसमावेशक असल्याने भारताने कमीत कमी खर्चात अधिक कार्यक्षम डिजिटल प्रणाली निर्माण केली आहे.
शासनाचा सर्वंकष पाठिंबा
भारत सरकार, RBI व विविध मंत्रालयांनी सर्व तो परी पाठिंबा देत रिअल-टाइम पेमेंट प्रणालीच्या अंमलबजावणी साठी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे भारतात जेवढ्या यशस्वी पद्धतीने रिअल-टाइम पेमेंट्स रुजले, ते इतर आशियाई देशांमध्ये शक्य झाले नाही.
भारताचे जागतिक नेतृत्व
आज भारत फिनटेक नवोपक्रमाचे जागतिक नेतृत्व करत आहे. मंदार आगाशे यांच्या सर्वत्र कंपनीने भारतातील पहिल्या प्रोग्रामेबल डिजिटल करन्सी (CBDC) प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या फिनटेक यशाची दखल सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांपासून ते ब्रिटिश राज घराण्यापर्यंत घेतली जात आहे.
कॉमनवेल्थ आणि त्रिनिदाद व टोबॅगोच्या निमंत्रणावर आगाशे यांनी किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिलाशीही डिजिटल पेमेंटबद्दल संवाद साधला. हे भारताच्या जागतिक फिनटेक प्रभावाचे द्योतक ठरते.
एकंदरीत पाहिले तर, मंदार आगाशे यांचा ‘सर्वत्र’ या माध्यमातून झालेला प्रवास हा भारतातील डिजिटल क्रांतीचा केंद्रबिंदू ठरला आहे. परवडणारे, सुरक्षित आणि जागतिक मान्यतेस पात्र ठरणारे डिजिटल व्यवहार यामुळे शक्य झाले. भारताने आता फिनटेक जागतिक पातळीवर आपले ठसा उमटवलेला आहे आणि त्यामागे मंदार आगाशे यांचे योगदान अमूल्य आहे.