डॉ.यशवंत कुलकर्णी – एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व व आदर्श कार्यकारी संचालक | Dr. Yashwant Kulkarni | MD
कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेल व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.यशवंत कुलकर्णी !

कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेल व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.यशवंत कुलकर्णी !
सहकार क्षेत्राला नवीन आयाम देणारं कर्तृत्व, जनसामान्यांच्या व आपल्या सहकाऱ्यांच्या अडचणी सोडविणारं नेतृत्व व माणुसकीच्या ही पलीकडचं विलक्षण सेवाभावी दातृत्व असलेले व्यक्तीत्व म्हणजे कर्मवीर.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला लाभलेले कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी सरांचा प्रेमळ स्वभाव व त्यांची उपक्रमशीलता यामुळेच माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच तुम्ही एक अविस्मरणीय आणि सर्वांच्या कायम लक्षात राहणारे व्यक्तिमत्व आहात.
लक्ष्मी व सरस्वती एका ठिकाणी वास्तव्य करीत नाहीत असे म्हटले जाते, सरस्वतीचे जिथे वास्तव्य आहे, अशा ठिकाणी लक्ष्मी थांबत नाही हे सत्य आहे. परंतु सरांना लक्ष्मीचा वरदहस्त तर आहेच शिवाय सरस्वतीचेही ते निःसीम भक्त आहे. तसेच ते वक्ते, श्रोते व ज्ञाते आहेत कारण समोरच्या व्यक्तीचे नेमके म्हणणे काय आहे. हे जाणून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. उत्कृष्ट निर्णय क्षमता, सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास यामुळेच आपण पदभार स्वीकारल्यापासून कै.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग स.सा.कारखान्याला अनेक पुरस्कार प्राप्त आहेत उदा. दाखल वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचा उत्कृष्ट तांत्रिक क्षमतेचा पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय निर्माणरत्न पुरस्कार इंदिरा गांधी इफिशियन्सी अवॉर्ड व नुकतेच आपणास लोकमत आयकॉन अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नवराष्ट्र समूहाने आदर्श कार्यकारी संचालक पुरस्कार नुकताच त्यांना देऊन गौरवले आहे. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन, सरांबद्दल लिहावंस वाटलं कारण शहिद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या वतीने शहिद निवृत्ती जाधवांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण द्यावयास गेलो होतो. परंतु आपल्या व्यस्त वेळेतून त्यांनी मोलाचा वेळ तर आम्हाला दिलाच परंतु कार्यक्रमाचे मार्गदर्शनही केले. या निमित्ताने त्यांच्या आपुलकीने माणुसकीचे दर्शन पडले. आपल्या कार्यालयातील प्रसन्न वातावरण, आपले प्रसन्न व्यक्तीमत्व व त्याचबरोबर आपल्यावर वरदहस्त असलेला आपल्या कार्यालयातील प्रसन्न असा दत्ताचा फोटो व सहकार क्षेत्रातील डॉक्टर व गुरुवर्य कै.सुधाकरपंत परिचारक यांचा फोटो मन भारावून घेणारेच आहेत. सरांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला व कार्यक्रमाला उपस्थित राहिले व आम्ही धन्य झालो. कारण साधी राहणी व उच्च विचारसरणी हे बाळकडू सरांना त्यांच्या संस्कारातून मिळाले असावे. कै.सुधाकरपंत परिचारक साहेबांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ केलात, परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे आज पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने, सांगली जिल्ह्यातील कृष्णामाईच्या आशिर्वादाने लाभलेल्या या सुपुत्राने आपल्या सहकाऱ्यासह पांडुरंग कारखान्याला एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवले आहे.
जगण्याच्या धावपळीत एखादाच दिवस असा उत्साहाचे पंख घेवून येतो आणि रोजच्या व्यस्त जीवनाला आनंदाचे वाढदिवसही असाच जगण्यात नवीन स्वप्न, नवा आनंद भरणारं गुलाब पुष्पाप्रमाणे सदैव टवटवीत व्यक्तीमत्व असलेल्या बहुविध क्षेत्रांमध्ये यशवंत व किर्तीवंत असलेल्या कुलकर्णी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!
-सारीका नाईकनवरे,निवेदिका व लेखिका, श्रीपूर



