महाराष्ट्र

महाळुंग-बोरगाव मध्ये शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक दाखले, प्रमाणपत्र वाटप शिबिर संपन्न

शिबिरामध्ये 300 चे वर प्रस्ताव दाखल

शिबिरामध्ये 300 चे वर प्रस्ताव दाखल

महाळुंग तालुका माळशिरस : जिल्हाधिकारी डॉ.कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये व विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी अकलूज व तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या पुढाकारातून “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत महाळुंग, बोरगाव मध्ये दि.13 व 14 रोजी स्थानिक सेतू केंद्राच्या मदतीने, महाळुंग मंडल कार्यालया अंतर्गत असणाऱ्या गावातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असणारे, नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, जातीचा दाखला, डोमासाईल, नॅशनॅलिटी प्रमाणपत्राचे काढण्यासाठीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 344 च्या वर प्रमाणपत्र मिळण्यासाठी चे प्रस्ताव पालक, विद्यार्थ्यांकडून शिबिरामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी काही पालक, विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देण्यात आले

यासाठी तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, महाळुंग मंडल अधिकारी विजय लोखंडे, महाळुंग-बोरगाव तलाठी स्वप्निल जगदाळे, नेवरे तलाठी सुदर्शन क्षीरसागर, माळखांबी तलाठी रविकिरण लोखंडे, जांबुड तलाठी राहुल जमदाडे, उंबरे(वे) मिरे तलाठी परमेश्वर ठवरे, नवनियुक्त  तलाठी अजय टकले व श्वेता साखळकर,  कोतवाल संभाजी चव्हाण, अंकुश नवगिरे, दत्ता साठे, पवन चंदनशिवे, बापू चंदनशिवे, आपले सरकार सेवा केंद्र चालक दत्ता देशमुख, ज्योतीराम जाधव, सज्जन पवार, इक्बाल मुलाणी, प्रमोद पांढरे आदींनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!