महाराष्ट्र

श्रीपूर | शिवछत्रपती गणेशोत्सव तरुण मंडळ | शिवाजीनगरला  मिळाले | प्रथम क्रमांकाचे विघ्नहर्ता पारितोषिक 2023

तृतीय क्रमांक | श्री मोरया गणेशोत्सव मंडळ, श्रीनाथनगर बोरगाव 

प्रथम क्रमांकाचे ‘विघ्नहर्ता पारितोषिक 2023’ चे मानकरी ठरले शिवछत्रपती गणेशोत्सव तरुण मंडळ,श्रीपूर 

तृतीय क्रमांक | श्री मोरया गणेशोत्सव मंडळ, श्रीनाथनगर बोरगाव 

अकलूज मध्येगणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

श्रीपूर तालुका माळशिरस येथील शिवछत्रपती गणेश उत्सव तरुण मंडळ यांनी गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये आणि वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. अकलूज नगर परिषद आणि अकलूज पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विघ्नहर्ता पारितोषिक 2023 या स्पर्धेचे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते.  या स्पर्धेच्या नियमांच्या सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्यामुळे 2023 विघ्नहर्ता पारितोषिक या गणेशोत्सव मंडळाला मिळाले आहे. 

या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण अकलूज नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे, अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, अकलूजचे माजी ग्रामपंचायत सरपंच किशोरसिंह माने-पाटील, जेष्ट पत्रकार भाग्यवंत नायकुडे, पत्रकार नागेश लोंढे, सागर खरात, दत्ता नाईकनवरे, सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. 

विघ्नहर्ता पारितोषिक शहरी भागामधून मोठ्या गटातून तीन व लहान गटातून तीन आणि ग्रामीण भागामधून तीन अशा प्रकारे 9 मंडळांना सदर पारितोषिक वितरण गणेशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळाला भेटी देऊन ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे परीक्षक व  इतर परीक्षक यांचे सहकार्याने परीक्षण करून पुढील  गणेशोत्सव मंडळाला विघ्नहर्ता पारितोषिक 2023  देण्यात आले.

शहर छोटा गट

प्रथम क्रमांक :- हनुमान तालीम गणेशोत्सव मंडळ, अकलूज. 

द्वितीय क्रमांक :-पगडी चा राजा गणेशोत्सव मंडळ, घरकुल अकलूज. 

तृतीय क्रमांक :-  दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ दत्तनगर अकलूज 

अकलूज शहर मोठा गट

प्रथम क्रमांक :- श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ गोळीबार चौक अकलूज.

द्वितीय क्रमांक :- बुरुजा गणेशोत्सव मंडळ अकलूज.

तृतीय क्रमांक :- वसंत विहार पोलीस कॉलनी गणेशोत्सव मंडळ अकलूज.

ग्रामीण भाग

प्रथम क्रमांक :- शिवछत्रपती गणेशोत्सव तरुण मंडळ शिवाजीनगर,श्रीपूर 

द्वितीय क्रमांक :- नंदेश्वर गणेशोत्सव मंडळ लवंग

तृतीय क्रमांक :- श्री मोरया गणेशोत्सव मंडळ श्रीनाथनगर बोरगाव 

या गणेशोत्सव मंडळांना ट्रॉफी देऊन, मंडळाच्या अध्यक्षपदाधिकाऱ्यांचे सत्कार व कौतुक करण्यात आले.

गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

आगामी काळात दिनांक 07/09/2024 ते दिनांक 17/09/2024 या कालावधीत श्री. गणेश उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार असल्याने त्याअनुषंगाने अकलूज पोलीस ठाणे व अकलूज नगरपरिषद यांचेवतीने सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, गणेशमुर्ती विक्रेते, अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पत्रकार बांधव, जेष्ट नागरीक यांची दिनांक  नगरपरिषद कार्यालय, अकलूज येथे शांतता कमिटी बैठक घेण्यात आली .सदर बैठकीमध्ये नगरपरिषद सी.ई.ओ. दयानंद गोरे, अकलूजचे माजी ग्रामपंचायत सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेशोस्तव मंडळ निवड समितीचे परीक्षक जेष्ट पत्रकार भाग्यवंत नायकुडे व अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या उपस्थितीत  आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी घेणेबाबत, डॉल्बी, डी.जे. न वाजवता पारंपारीक वाद्य वाजवुन प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करणेबाबत, सामजिक तेढ निर्माण करणारे देखावा सादर न करणेबाबत, गणेश मुर्तीचे पावित्र्य राखण्याचे अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करुन गणेश उत्सव मंडळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविणेबाबत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा रितीने मुर्ती स्थापना करणेबाबत तसेच जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट गणपती, उत्कृष्ट समाजउपयोगी देखावा याबाबत शासन स्तरावर असलेले बक्षीस योजनेबाबत व अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेशोस्तव मंडळ निवड याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

तसेच अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे गतवर्षी आयोजित अकलूज येथील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ 2023 याचे पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सदरची शांतता कमिटी बैठक मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो।, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सो।, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो। यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असुन आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने आवश्यक सुचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!