शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्याचे केले मान्य | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
श्रीपूर मध्ये झालेल्या कामगारांच्या महामेळाव्याला आले यश | राज्य शासनाने मोर्चाची घेतली धास्ती

श्रीपूर मध्ये झालेल्या कामगारांच्या महामेळाव्याला आले यश | राज्य शासनाने मोर्चाची घेतली धास्ती
शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्याचे केले मान्य | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राज्यातील शेती महामंडळाच्या चौदा ऊस मळ्यातील कामगारांना रहाण्यासाठी राज्यशासनाने दोन गुंठे राहण्यासाठी जागा देण्याचे आज पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. इतर उर्वरीत मागण्या मंत्रीमंडळ उच्चस्तरीय बैठकीत पुढे निर्णय घेण्यात येईल असे मंत्रीमहोदय यांनी सांगितले. गेले अनेक वर्षे शेती महामंडळ कामगार रहाण्याच्या जागेचा प्रश्न प्रलंबित होता. शेती महामंडळ कामगार संघटना यांनी जोर लावून हा प्रश्न सोडवला आहे. गेल्या काही श्रीपूर येथे शेती महामंडळाच्या कामगारांचा मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नावर पुणे येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरले होते. कामगार संघटना लढा कृती समितीचे लढाऊ नेते सुभाषराव कुलकर्णी माळशिरस तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ माळशिरस तालुका शेती महामंडळ युनिट सेक्रेटरी भालचंद्र शिंदे पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून दोन गुंठे जागा मिळवून दिली त्या बद्दल शेती महामंडळ कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. महामंडळ कार्यक्षेत्रातील कामगारांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. याबद्दल कामगार संघटनाच्या सदस्यांनी राज्य शासनाचे आभार मानले. आणि राहिलेल्या मागण्या त्वरित मंजूर करण्याबाबत विनंती देखील केली.