‘पांडुरंग’ कारखाना साखर उताऱ्यामध्ये जिल्ह्यात प्रथम | ऊस गाळपामध्ये द्वितीय | PSSK
कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 ची सांगता

“कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 ची सांगता”
(जिल्ह्यात साखर उताऱ्यामध्ये प्रथम क्रमांक आणि ऊस गाळपामध्ये द्वितीय क्रमांक )
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 ची सांगता कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास शंकरराव खुळे यांचे शुभहस्ते व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम 2024-25 हा 98 दिवस चालवून सुमारे 8.00 लाख मे. टन उसाचे गाळप करून आज सांगता समारंभ संपन्न झाला आहे. या हंगामात कारखान्याने सरासरी 11% इतका जिल्हात सर्वोच्च साखर उतारा मिळविला आहे. या हंगामात कारखान्याने ऊस गाळपामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे गाळप केले असून कारखान्याने विना खोळंबा, विनाखंड गाळप केले आहे. या हंगामामध्ये कारखाना कधीही नो-केन झालेला नाही. या हंगामात कारखान्याचा आसवनी प्रकल्प ही व्यवस्थित सुरू असून यापुढेही हा प्रकल्प सुमारे तीन महिने चालणार आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा को-जेनरेशन प्रकल्पही यानंतर तीन महिने चालविला जाणार असून यामधून उत्पन्न घेतले जाणार आहे. कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे व संचालक मंडळाचे व सभासद शेतकरी यांचे सहकार्याने हा गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण करु शकलो.
यावेळी बोलताना कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री कैलास खुळे सर यांनी माहिती दिली की, या हंगामात कारखाना व उपपदार्थ प्रकल्प उत्कृष्टपणे चालेले आहेत. त्यामुळे कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी, कामगार अणि सभासद यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी आदी उपस्थित होते.
“कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गाळप हंगाम 2024-25 हा विनाखंड गाळप करणारा हंगाम ठरला असून या कालावधित एकही दिवस कारखाना ऊसाअभावी बंद राहिला नाही. त्यामुळे गाळपामध्ये सातत्य राहून कारखान्याच्या दैनंदिन सरासरी गाळपामध्ये वाढ झाली आहे. कारखान्याने या हंगामात 11% सरासरी साखर उतारा मिळविला असुन तो जिल्ह्यात अव्वल असल्याने ही बाब कारखान्याच्या दृष्टीने गौरवाची असून यापुढेही अशाच प्रकारे कारखाना चालविला जाईल.”-डॉ.यशवंत कुलकर्णी,कार्यकारी संचालक