राजाभाऊ गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
डॉ.आण्णाभाऊ साठे क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

बोरगाव प्रतिनिधी :
डॉ.आण्णाभाऊ साठे क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन बोरगाव तालुका माळशिरस येथील रहिवासी असणारे राजाभाऊ गायकवाड यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून भावी समाजकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदरची निवड ही पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय आढावा बैठकी दरम्यान करण्यात आली यावेळी राजाभाऊ गायकवाड यांनीआपले मनोगत व्यक्त केले. “दिलेली जबाबदारी ही समाजाच्या हितासाठी व कल्याण साठी अहोरात्र काम करून वरिष्ठांचा आदेश मानून व पदाचा मान राखून काम करणे समाजासाठी व समाज कसा प्रगतीपथावर जाईल, समाजावर होणाऱ्या अन्याला वाचा होण्यासाठी न्यायप्रविष्ट भूमिका बजावेन व अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये क्रांतीची ज्योत निर्माण करून वादळ उठून देईल, हीच अण्णाभाऊ साठे यांना माझी आदरांजली अर्पण करतो.”असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी सज्जन लोखंडे यांची निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांनीही समाजासाठी योग्य पावली सचिन भाऊ साठे यांचे नेतृत्व मान्य करून तन-मन – धनाने कार्य करू असे सांगितले.