कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थेकडून कडून वृध्दाश्रमातील वृद्धांना कपडे वाटप | आधार वृध्दाश्रम
हाटकर समाजाचा स्नेहमेळावा संपन्न

वडाचीवाडी ता.माढा येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित आधार या वृध्दाश्रमा मधील वृद्धांना कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थेकडून कपड्याचे वाटप करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन सचिन कौले साहेब (समाज कल्याण अधिकारी) यांच्या स्पर्श सेवाभावी संस्था संचलित आधार या वृध्दाश्रमाला सकल हाटकर समाजाने भेट दिली व तेथे हाटकर समाज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून झाली समाजातील मात्तबर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते “कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थे” मार्फत वृध्दाश्रमातील 25 सदस्यांना कपडे वाटप करण्यात आले. समाजातील विविध घटकांनवर चर्चा झाली. समाज संघटीत कसा करता येईल व संघटीत होण्याचे फायदे यावर प्रा.बाळासाहेब दबडे सर, डॉ.आप्पासाहेब भुसनर, प्रा.महादेव पाटील, डॉ. महादेव खोत, रविंद्र जिपटे, दत्तात्रय भुसनर, हेमंत पाटील, ह.भ.प.आण्णा भुसनर महाराज, प्रा. सुभाष पाटील, विजय मरगर अशा अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर सुत्रसंचालनाची जबाबदारी धनंजय कवले यांनी पार पाडली
कर्तव्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष महादेव पाटील, संघटक दत्तात्रय भुसनर, खजिनदार बाळासाहेब दबडे, संपर्क प्रमुख रविंद्र जिपटे या सर्वाचे सचिन कवले साहेब व समस्त कवले परिवार वडाचीवाडी यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.