महाळुंग मंदिरात चोरी | यमाई देवीचे दागिने पळविले | Mahalung | Yamaidevi
शुक्रवारी भर दिवसा दुपारी घडली घटना | ग्रामस्थ व यमाईदेवी भक्तांची बैठक

महाळुंग तालुका माळशिरस येथील यमाईदेवी मंदिरामध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास मंदिर गाभाऱ्यात कोणी नसल्याचे लक्षात आल्यावर डाव साधून चोरट्याने यमाई देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. खरबूज मनी असलेली सोन्याची माळ, मंगळसूत्र आणि कारले मनी असलेली सोन्याची माळ, अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे दागिन्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
सध्या नवरात्र उत्सवाची तयारी मंदिर परिसरामध्ये सुरू आहे. याचाच चोरट्याने गैरफायदा घेऊन मंदिर गाभाऱ्यात कोणी नाही, हे चोराच्या लक्षात आल्यावर दागिन्याची चोरी झाली आहे. दुपारी मंदिरात पुजारी आल्यानंतर देवीचा मुकुट समोर एका साईडला कल्याचे लक्षात आल्यानंतर दागिन्याची चोरी झाल्याचे मंदिर पुजाऱ्याच्या लक्षात आले आणि ही घटना उघड झाली आहे.
महाळुंग यमाई देवीचे दागिने मंदिरातून चोरी होण्याची ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. काल अकलूज पोलिसांनी मंदिरामध्ये भेट दिली आहे.
ग्रामस्थ व यमाईदेवी भक्तांची बैठक
नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे आणि सर्वांचे ग्रामदैवत असलेल्या देवीच्या दागिन्याची चोरी झालेली आहे. यमाई देवीभक्त आणि गावकऱ्यांनी वर्गणी करून गेलेले सोन्याचे दागिने परत देवीच्या चरणी अर्पण करण्याचे प्राथमिक बैठकीत ठरले आहे.
मंदिरात व मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची ग्रामस्थांमधून होत आहे मागणी.