श्रीपूर मध्ये अकलूज पोलिसांची रोडरोमिओ आणि वाहनांवरती कारवाई | Akluj-Shreepur Police
नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे यांनी दिले होते पोलिसांना निवेदन

शाळेला जाताना येताना मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे यांनी पोलिसांना निवेदन दिले होते.
श्रीपूर तालुका माळशिरस येथे अकलूज पोलीस स्टेशनच्या पथकाने शनिवारी सकाळी श्री चंद्रशेखर विद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीपूर येथे रोड रोमिओ आणि अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या मुलांवरती, ट्रिपल सीट, फोनवरती बोलत गाडी चालवणाऱ्यांवरती, गाडीला नंबर प्लेट नसणाऱ्यांवरती, लायसन नसणाऱ्यांवरती, ट्राफिक चे नियम मोडल्याबद्दल 15 जणांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला, शाळेकडे व चौकात फिरत असणाऱ्या रोड रोमिओला समज देऊन कारवाई करण्यात आली
या संदर्भात महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे यांनी एपीआय विक्रम साळुंखे यांना निवेदन दिले होते. गाडीचे सायलेन्सर मधील पुंगळी काढून मोठा आवाज करत, फास्ट जोरदार गाडी चालवल्यामुळे मागच्या आठवड्यात दोन अपघात झाले आहेत. महिलांना व शाळेमधील मुलींना जाताना येताना त्रास देणाऱ्या रोड रोमिओ वरती, आठ दिवसातून शाळा परिसर आणि चौकामध्ये कारवाई करण्यात यावी या संदर्भात निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन अकलूज पोलिसांनी श्रीपूर मध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई पथकामध्ये हवालदार हनुमंत झिंजे, सिद्धू कंटोळे, पोलीस कॉन्स्टेबल इनुस आत्तार, विठ्ठल मिसाळ, शब्बीर नदाफ यांनी कारवाई केली.