नेत्याच्या वाढदिवसाचा खर्च कार्यकर्त्याने लावला सत्कारणी, केला सामुदायिक विवाह सोहळा
श्रीपूर मध्ये पार पडला सामुदायिक विवाह सोहळा

कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त श्रीपूर मध्ये पार पडला सामुदायिक विवाह सोहळा
श्रीपूर तालुका माळशिरस येथे शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त श्रीपूर-महाळुंग मध्ये सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. मोहिते-पाटील समर्थक असणारे युवा कार्यकर्ते बजरंग भोसले यांनी वाढदिवसाचा खर्च अन्य मार्गाने वायफळ जाण्यापेक्षा, नवीन संसाराची वाटचाल करून देण्यासाठी, नव जोडप्यांना कपडे, भांडी, जेवण, मंडप, वाजंत्री, घोडा हा सर्व खर्च दोन जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावून या युवकाने समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
या विवाह सोहळ्यासाठी खास उपस्थित शिवशंकर बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, अकलूजचे माजी लोकप्रिय सरपंच शिवतेसिंह मोहिते-पाटील, देवण्या मोहिते-पाटील, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, गटनेते नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, गटनेते नगरसेवक राहुल रेडे-पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सज्जनरव जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र सावंत-पाटील, माजी जि प सदस्य अरुण तोडकर, पैलवान अशोक चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल मुंडफणे, महाळुंग सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर, सामाजिक कार्यकर्ते मौला पठाण, नगरसेवक निनाद पटवर्धन, रावसाहेब सावंत-पाटील, विक्रांत काटे, विक्रम लाटे, डॉ.संजय लाटे, जालिंदर लोखंडे, उद्योजक महावीर शहा, आरपीआयचे ज्येष्ठ नेते शामराव भोसले, प्रा.नरेंद्र भोसले, सागर यादव, रमेश देवकर, सोमनाथ यादव, विपीन सूर्यवंशी, बबलू भगत, राजू शिंदे, तनवीर तांबोळी, अक्षय जाधव, अनिल सरवदे, नितीन जाधव, जावेद पठाण, दादा पवार, विनोद कडलासकर, नागा भोसले, विनोद मगर, उमेश राणे, भैय्या मते, औदुंबर रेडे, नामदेव यादव, ज्ञानेश्वर कांबळे, आनंद शिंदे, बंडू नवगिरे, सिकंदर,पठाण, नंदू नाईकनवरे, छोटू मुलांणी, आदेश रेडे, संतोष काळुंखे,अजय जाधव, शुभम जाधव, माधव यादव, शुभम यादव आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक बजरंग भोसले यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नरेंद्र भोसले यांनी केले.