शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ग्रोमोरकडून थेट माफक दरात शेतीसाहित्य महाळुंग-श्रीपूर मध्ये
आपलं ग्रोमोर केंद्र महाळुंग-श्रीपूर मध्ये कार्यान्वित

शेतकरी येता ग्रोमोर ला, शांती लाभो पिकाला – ‘आपलं ग्रोमोर’ केंद्राचा महाळुंग-श्रीपूर येथे दिमाखदार शुभारंभ
महाळुंग–श्रीपूर (उजनी कॉलनी) येथे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या ‘आपलं ग्रोमोर’ या शेतकरी सेवाभिमुख केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. शेतकरी येता ग्रोमोर ला, शांती लाभो पिकाला या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना थेट कंपनीकडून दर्जेदार शेतीसाहित्य उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास सहकार महर्षी साखर कारखान्याचे मा.व्हॉइस चेअरमन रामचंद्र सावंत-पाटील, नगरसेवक गटनेते नानासाहेब मुंडफणे, नगरसेवक तानाजी भगत, डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील, समाजसेवक मौला पठाण, उद्योजक राजकुमार रेडे, विविध मान्यवर, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कंपनी अधिकाऱ्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
यावेळी कंपनीचे उपस्थित अधिकारी सोलापूर एम आर ओ विष्णू शेंबडे, श्रीपूर आरएसएम महावीर मिस्कर, माळशिरस आर एस एम गणेश वाघमोडे, टेंभुर्णी आरएसएम केतन वाघ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
‘आपलं ग्रोमोर’ केंद्रामार्फत आता शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच शेतीसाठी आवश्यक आधुनिक उत्पादने थेट कंपनीतून माफक दरात उपलब्ध होणार आहेत. यामुळे मध्यस्थांचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य दरात विश्वासार्ह उत्पादने मिळणार आहेत.
मार्गदर्शन व सेवा एकाच छताखाली
या केंद्राची विशेष बाब म्हणजे केवळ विक्री नव्हे तर पीकनिहाय तांत्रिक मार्गदर्शन,मोफत माती परीक्षण करून दिले जाणार आहे, माती परीक्षणानुसार सल्ला, खतांचे योग्य प्रमाण, रोग व किडी नियंत्रणाबाबत माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
परिसरातील शेतीस चालना
महाळुंग, श्रीपूर व उजनी परिसरातील शेती प्रामुख्याने ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला व इतर नगदी पिकांवर आधारित आहे. अशा भागात ‘आपलं ग्रोमोर’ केंद्र सुरू झाल्याने आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार असून शेती अधिक शाश्वत व नफ्याची बनवण्यास हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत “शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे” अशा भावना व्यक्त केल्या.



