महाळुंग | यमाई देवी बद्दलची विशेष माहिती | तुम्हाला चालू नवरात्र उत्सवामध्ये ठरेल उपयोगी
श्री यमाईदेवी, महाळुंग नवरात्र उत्सव - 2024

नवरात्र उत्सवामधील महाळुंग यमाईदेवीची पूजा, उपवास, दंडवत, घट उठवणे, दसरा, शिमोल्लंघन, पोर्णिमा. याचे असे असेल नियोजन
नवरात्र उत्सव आरंभ- महाळुंग तालुका माळशिरस येथील सर्वांचे ग्रामदैवत आई यमाईदेवी मातेची गुरुवार दिनांक 3.10.2024 रोजी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाचा आरंभ झाला.
पाच दिवसाचा उपवास- जे भाविक भक्त पाच दिवसाचा उपवास धरतात, त्यांनी सोमवार दिनांक 7.10.2024 पासून देवीचा उपवास करण्यास सुरुवात करावी.
शेवटचे दोन दिवसाचा उपवास- नवरात्र उत्सवातील शेवटचे दोन दिवसाचा उपवास करणाऱ्यांनी गुरुवार दिनांक 10.10.2024 व शुक्रवार दिनांक 11.10.2024 या दिवशी उपवास करावेत.
महा उपवास / दंडवत- शुक्रवार दिनांक 11.10.2024 या दिवशी दुर्गाष्टमीचा महाउपास असून या दिवशी यमाईदेवी मातेस पहाटे महा अभिषेक (भोगी) होऊन वाहनावरील सालंकृत पूजा व पानांची पूजा बांधण्यात येईल. याच दिवशी पहाटेपासून मातेच्या चरणी दंडवत सेवा करण्यात येईल .
दंडवत- शुक्रवार दिनांक 11.10.2024 या दिवशी पहाटेपासून मातेच्या चरणी दंडवत सेवा चालू, नवरात्र उत्सवात इच्छेनुसार, श्रद्धेनुसार भाविक भक्तांनी मातेच्या चरणी दंडवत सेवा करावी.
घट उठवणे \ दसरा (विजयादशमी) \ शिमोल्लंघन उत्सव- शनिवार दिनांक 12.10.2024 रोजी देवीचे घटोत्थान (घट उठवणे) घट उठवण्यात येतील. तसेच त्याच दिवशी दसऱ्याचा सण असल्यामुळे यमाई मातेस महाभिषेक, सालंकृत अश्वारूढ पूजा करण्यात येईल. या दिवशी मातेला पालखीत बसवून वालाडी येथील पादुका मंदिर येथे शिमोल्लंघन उत्सव साजरा करण्यासाठी घेऊन जाण्यात येईल.
दसरा ते पौर्णिमेपर्यंतची पूजा- शिमोल्लंघना नंतर मातेस गरम पाण्याने स्नान घालण्यात येईल. उत्सवमूर्तीस मंदिरातील शेजगृहात पलंगावरती मातेस निद्रेसाठी पौर्णिमेपर्यंत विश्रांतीसाठी ठेवण्यात येईल.
कोजागिरी पौर्णिमा- दिनांक बुधवार 16.10.2024 रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येईल.
अशी माहिती यमाई देवी मंदिराच्या पुजाऱ्याकडून भाविक भक्तांच्या माहितीस्तव देण्यात आली आहे.