महाळुंग-श्रीपूर प्र.क्र.14 मध्ये 1 कोटी रु. विकास कामाचा शुभारंभ
सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, डांबरीकरण रस्ते, भुयारी गटाराचे काम सुरू

श्रीपूर ता.माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार फंडातून व जि प सदस्य रणजीतभैय्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाने एक कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यामध्ये शहीद निवृत्तीनगर(विकासनगर) उड्डाणपूल ते साळुंखे वस्ती-मांडवे वस्ती सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता 35 लाख रुपये. जिजाऊनगर-शहीद निवृत्ती नगर-खरात वस्ती डांबरीकरण पक्का रस्ता 25 लाख रुपये. आगाशे नगर मध्ये भुयारी गटार मोहन सुतार घर ते देठे घर 25 लाख रुपये. आगाशे नगर मध्ये सिमेंट काँक्रिटीकरण रोड व भुयारी गटार सुवर्णा साळुंखे घर ते पारसे घर 10 लाख रुपये. साईनगर मध्ये पवार घर ते कुलकर्णी घर भुयारी गटार 5 लाख रुपये असा एकूण एक कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निधीचा शुभारंभ आगाशेनगर मध्ये करण्यात आला.
या विकास कामाचा शुभारंभ नगरसेविका शारदाताई नामदेव पाटील यांच्या शुभहस्ते जेसीबी ची पूजा करून करण्यात आला. यावेळी गटनेते व नगरसेवक राहुल रेडे, नामदेव पाटील, नगरसेवक नामदेव इंगळे, शिवाजी रेडे, डॉ.सुहास बनसोडे, तुकाराम पाटील, माजी सरपंच लक्ष्मण आतार, रोहित पाटील, देवाप्पा खांडेकर, शिवाजी पाटील, या मान्यवरांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.