महाराष्ट्र

व्हाॅलीबॉल | जयंत खंडागळे व्हाॅलीबॉल संघ यांनी मिळवले प्रथम क्रमांकाचे बक्षीस

कै. यश कोठारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हाॅलीबॉल स्पर्धाचे अयोजन !

श्रीपुर प्रतिनिधी : श्रीपुर येथील ब्रिमा सागर कारखान्यात कै. यश कोठारी यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त व्हाॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे डायरेक्टर उदय कोठारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू जयंत खंडागळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय मोरे यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र व्हाॅलीबॉल संघाचे कर्णधार व ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, दत्ताञेय मोरे  यांचा सन्मान कारखान्याचे डायरेक्टर उदय कोठारी व जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डे. मॅनेजर चंद्रकांत भागवत, नरेश पाठक, जयंत आरगडे, सुरक्षा अधिकारी भागवत पारसे, व व्हाॅलीबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या व्हाॅलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक जयंत खंडागळे व्हाॅलीबॉल संघ   आकरा हजार १११ रुपये व ट्रॉफी ,  दुसरे बक्षीस  बी एस एम डी एल व्हाॅलीबॉल संघ अ श्रीपुर सात हजार १११ रुपये  व ट्रॉफी,  तिसरे बक्षीस बिजवडी व्हाॅलीबॉल संघ तालुका माण जिल्हा सातारा पाच हजार १११ रुपये व ट्रॉफी, चौथे बक्षीस दूध पंढरी हॉलीबॉल संघ पंढरपूर  तीन हजार १११ रुपये व ट्रॉफी त्याच बरोबर बेस्ट नेटसमन विशाल शेरे , बेस्ट डिफेन्सर शुभम भोसले, बेस्ट शूटर जुनेद कुरेशी आदी. विजेत्यांना ब्रिमा सागरचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या स्पर्धेसाठी अंपायर म्हणून रहीम तांबोळी, दादा पवार, स्कोरर म्हणून नितीन मिसकर यांनी काम पाहिले तर या स्पर्धेचे सुंदर असे समालोचन अनिल रणदिवे, आप्पा खुळे यांनी केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी भागवत पारसे, ऋषिकेश सदगर, सत्यजित पाटील, नानासाहेब केचे, अफजल शेख, रवींद्र नाईकनवरे,जयवंत गरड, दादा पवार , अजय खरे, पांडुरंग जाधव आबा मिस्कर , रहीम तांबोळी, व ब्रिमा सागर कामगार वर्ग, सर्व व्हाॅलीबॉल खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!