पांडुरंग कारखान्याने दिले आधुनिक (AI) एआय तंत्रज्ञानाचे शेतकरी सभासदांना प्रशिक्षण

पांडुरंग कारखान्याचा शेतकरी, जगाच्या तुलनेत शेती करताना पुढे जावा, शेतामध्ये AI एआय तंत्रज्ञानाचा वापर त्याने करावा, यासाठी कारखान्याच्या वतीने ठेवले मार्गदर्शन शिबिर – डॉ.यशवंत कुलकर्णी
शेतकरी बांधवांनी ए आय तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन वाढवून प्रगती करावी-अरुण देशमुख, कृषी तज्ञ नेटाफिम
श्रीपूर प्रतिनिधी : श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकरी बांधवांसाठी अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानाद्वारे शेती कशी करावी या विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण पंढरपूर येथे देण्यात आले. यावेळी बोलताना “शेतकरी बांधवांनी सभासदांनी जगामध्ये नवीन आलेल्या व शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनामध्ये वाढ करून प्रगती करावी असे प्रतिपादन कृषी तज्ञ नेटाफिम अरुण देशमुख यांनी केले ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने व व्ही एस आय पुणे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लि यांच्या संयुक्त विद्यमाने दाते मंगल कार्यालय पंढरपूर येथे ए आय तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती या विषयावर कारखाना सभासदांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कृषी तज्ञ नेटाफिम अरुण देशमुख, शास्त्रज्ञ अनिल मुंडे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ संतोष कारंजे, कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व्हाईस चेअरमन कैलास खुळे ज्येष्ठ संचालक दिनकर मोरे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांची ओळख कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी करून देऊन . प्रस्ताविकात डॉ यशवंत कुलकर्णी यांनी ए आय तंत्रज्ञानाबाबतची सखोल अशी माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन प्रशांतराव परिचारक म्हणाले की शेतकरी सभासद बांधवांनी आता जुन्या पद्धतीने शेती करण्यापेक्षा नवीन आलेल्या ए आय तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग करून ऊस उत्पादन वाढवावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना कृषी तज्ञ अरुण देशमुख म्हणाले की महाराष्ट्रामध्ये चालू हंगामाची परिस्थिती पाहिली असता २१ टक्क्याने गळीत कमी झाला आहे. तसेच २६ टक्क्यानी साखर उत्पादन कमी झाले आहे. ही चिंतेची बाब आहे महाराष्ट्रामध्ये मी अनेक कारखाने पाहिले पण त्यांचे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न दिसत नाहीत पण पांडुरंग साखर कारखान्यास चांगले नेतृत्व लाभल्याने गेली अनेक वर्षापासून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सभासदांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ऊस उत्पादन वाढवण्यासाठी सभासदांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत.पांडुरंग कारखान्याचे ऊस उत्पादन सरासरी १२३ टक्यापर्यंट गेले आहे ही मोठी आनंदाची बाब आहे. यामागे कारखान्याचे कष्ट आहेत म्हणून या कारखान्याला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत असे सांगून ते पुढे म्हणाले की शेतकरी बांधवांनी जुन्या पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे आले पाहिजे, ठिबक सिंचना चा वापर करून ऊस उत्पादन घेतले पाहिजे व जगाच्या बाजारपेठेमध्ये शेतीसाठी येऊ घातलेल्या ए आय तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चित आपणास ऊस पिकाला पाणी किती द्यावे, पिकावर रोग होणार असेल तर त्याची अगोदर माहिती मिळते, कोणती फवारणी करावी हे सांगितले जाते, ऊस उत्पादनासाठी कोणती खते वापरावीत याची माहिती दिली जाते . त्याचबरोबर ऊस उत्पादन घेण्यापूर्वी रान तयार करत असताना ते कसे तयार करावे याची तंतोतंत माहिती तंत्रज्ञान तुम्हाला देते या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांनी ऊस उत्पादन घेतल्यास निश्चितच दहा ते बारा महिन्यांमध्ये ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येईल यासाठी शेतकरी बांधवांनी या एआय तंत्रज्ञानाचा व नेटाफिम ठिबक सिंचनाचा वापर करावा व शेतीला जाणारे जादा पाणी वाचवावे व लागेल तेव्हाच पाणी द्यावे लागेल असे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांनी शासवत शेती करावी असे आवाहन अरुण देशमुख यांनी यावेळी केले. , शास्त्रज्ञ संतोष कारंजे यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील तंत्रज्ञानाबाबत सखोल माहिती देऊन व या तंत्रज्ञानाची शेतीमधील महत्त्व त्याचा वापर या बाबत सविस्तर माहिती दिली तसेच शास्त्रज्ञ अनिल मुंडे यांनी ही ए आय तंत्रज्ञाना मुळे होणारे फायदे याची तंतोतंत व सुंदर अशी माहिती दिली.
या चर्चासत्राला पांडुरंग कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार व चेअरमन कैलास खुळे यांनी मानले.