महाराष्ट्र
माळशिरस तालुका व जिल्हा वकील संघटणेचे अध्यक्ष पदी अॅड.मोहिनी देव यांची बिनविरोध निवड
न्यायालयीन ७१ वर्षाचे इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष-माळशिरस

माळशिरस- न्यायालयीन ७१ वर्षाचे इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष-
माळशिरस तालुका व जिल्हा वकील संघटणेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह-सचिव या पदांसाठी सन २०२४-२५ साठी निवडणुक कार्यक्रम जाहीर होवुन, नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडुन, निकाल जाहीर झाले. त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी अॅड. सौ. मोहिनी सुहास देव यांची बिन विरोध निवड होवुन, उपाध्यक्ष पदासाठी अॅड. श्री. राहुल लवटे, सचिव पदी अॅड. श्री. साजिद शेख, सह-सचिव पदी अॅड. नाजनिन शेख तर खजिनदार पदासाठी अॅड. श्री. राहुल लवटे यांची निवड होवुन, सर्वांनी त्यांचा पदभार स्वीकारला.
माळशिरस न्यायालयाचे गेले ७१ वर्षाचे कालावधीत प्रथमच अध्यक्ष म्हणुन महिला वकील व बिन विरोध होण्याचा मान अॅड. सौ. मोहिनी देव यांना मिळाला आहे.त्याबद्दल सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.