मतदारांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे – ॲड मीनल साठे
पटवर्धन कुरोली येथील जाहीर सभेत मीनल ताई साठे यांचे जनतेला आवाहन ...

कॉर्नर सभा, होम टू होम प्रचार करण्यावर ॲड.मीनल साठे यांचा भर
श्रीपूर प्रतिनिधी – माढा विधानसभा मतदारसंघाच्या माहिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ॲड.मीनल ताई साठे यांच्या प्रचारार्थ पटवर्धन कुरोली येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, माढा विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी गेल्या 30 वर्षापासून एकहाती असणारी सत्ता ही विस्थापित करून मतदारांनी या सत्तेचे विकेंद्रीकरण करून या निवडणुकीत लोकशाही बळकट करावी.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की या निवडणुकीमध्ये मी या मतदारसंघातील माढा तालुक्यातील 78 गावे, माळशिरस तालुक्यातील 14, गावे व पंढरपूर तालुक्यातील 42 गावे या सर्व गावांकडे स्वतःच्या गावाप्रमाणे लक्ष देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे.
या मतदारसंघातून महायुतीने मला एक लाडकी बहीण म्हणून उमेदवारी दिली मी या मतदारसंघातील सर्व भावांना विनंती करते की येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला विक्रमी मतदान करून विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. या भागातील नेमतवाडी, पेहे नांदोरे, आवे, पट कुरोली, देवडे, खेडभोसे ,पिराचीकुरोली या ठिकाणी प्रचार सभा पार पडल्या.
या सभेसाठी पटवर्धन कुरोली येथील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बाळासाहेब पाटील, उपसरपंच शैलजा तवटे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दाजी चंदनकर, परिचारक गटाचे समाधान पाटील, शिवसेनेचे सिद्धेश्वर नाईकनवरे ,अमोल गाढवे, सुवर्णा पाटील, वैशाली चंदनकर, रमेश तवटे, प्रहार अपंग संघटनेचे नामदेव खेडेकर,येथील कॉर्नर सभेसाठी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील, सामाजिक कार्यकर्ते रहीम शिकलकर, तेजस गायकवाड, रविराज भिंगारे ,शांतीलाल पाटील, संजय मोकळे, ग्रामपंचायत सदस्य कपिल पाटील,
नांदोरे येथे आज गाव भेट प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित – यावेळी श्री अजीनाथ भिंगारे, श्री हरीभाऊ भींगारे श्री दत्तू सातुरे,श्री अनिल भिंगारे श्री युवराज कांबळे उपस्थित होते. नेमतवाडी येथील कॉर्नर सभेसाठी, प्रकाश साबळे, भारत तूपसंदर, राजेंद्र जगताप,श्री श्रीमंत वाघमोडे, श्री अमोल अमराळे, श्री.विष्णू अमराळे , श्री शिवाजी काळे, श्री व्यंकटराव अमराळे उपस्थित होते. बादलकोट येथे आज गाव भेट प्रचार दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार ॲड.सौ.मिनलताई साठे यांनी उपस्थित नागरिकांची संवाद साधला. यावेळी श्री मारुती मदने, श्री दिलीप पाटील श्री संभाजी पाखरे श्री पोपत शेजवळ, श्री पोपट नाईकनवरे उपस्थित होते.