रांगोळीतून साकारला महाळुंग-श्रीपूर गावचा नकाशा | Mahalung-Shreepur Map
रत्नाईच्या कृषिकन्यांनी केले रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे सादरीकरण

श्रीपूर ता.माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित व रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज तालुका माळशिरस येथील कृषिकन्यांनी रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे सादरीकरण केले. रांगोळीद्वारे रेखाटलेल्या आराखड्यामध्ये महाळुंग-श्रीपूर गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन, वन स्त्रोत, जलस्त्रोत, पीक लागवड क्षेत्र, फळबागा, नगरपंचायत कार्यालय, मंदिर, दवाखाना, शाळा, विविध रस्ते, कारखाने तसेच गावातील प्रमुख ठिकाणे दाखवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कृषीकन्या रोशनी पवार, साक्षी माळी, शीतल आंधळे, प्रतिक्षा वाघमारे, वैष्णवी जगताप, साक्षी सरडे, नेहा धापटे, दिपाली माने, वैष्णवी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे कार्यक्रम सम्वयक , प्रोग्राम ऑफिसर प्रा. एम. एम. चंदनकर आणि प्रा, एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी महाळुंग-श्रीपूर येथील नगराध्यक्षा मॅडम लक्ष्मी अशोक चव्हाण, मुख्य अधिकारी सतीश चव्हाण साहेब, नगरसेविका शारदा नामदेव पाटील, नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे, पत्रकार दत्ता नाईकनवरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.