महाराष्ट्र

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूजच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश 

प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

जीसीसी-टीबीसी डिसेंबर २०२४ परीक्षेत कु.बनसोडे क्षितिजा कुबेर ९६% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम, तर साळुंखे सुरज द्वितीय आणि वळकुंडे काजल तृतीय

अकलूज ता. माळशिरस येथील भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी (कॉम्प्युटर टायपिंग स्पीड) परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्वल परंपरा कायम ठेवत दैदिप्यमान यश प्राप्त केले.

संस्थेतील कु. बनसोडे क्षितिजा कुबेर हिने कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा जीसीसी-टीबीसी इंग्रजी ३० श.प्र.मि. या विषयात ९६% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला, तर याच विषयात साळुंखे सुरज राजेंद्र याने ९४.५ गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांकाचा आणि वळकुंडे काजल मोहन हिने इंग्रजी ३० व मराठी ३० या विषयात ९३.५% गुण प्राप्त करत तालुक्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला.

जीसीसी-टीबीसी डिसेंबर २०२४ परीक्षेत विषयानुसार संस्थेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-

इंग्रजी ३० श.प्र.मि. या विषयात :- बनसोडे क्षितिजा कुबेर ९६% प्रथम, साळुंखे सुरज राजेंद्र ९४.५% द्वितीय, वळकुंडे काजल मोहन ९३.५% तृतीय.

इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात :-  कु.वळकुंडे काजल मोहन ९०% प्रथम, साळुंखे सुरज राजेंद्र व हाके सुशांत दत्तात्रय ८४.५% द्वितीय, नागरगोजे आर्यन भीमराव ८३% तृतीय.

मराठी ३० श.प्र.मि. या विषयात :- वळकुंडे काजल मोहन ९३.५% प्रथम, मुळे कल्याण रमेश ८९% द्वितीय, माने निकिता पांडुरंग ८७% तृतीय, असे गुण प्राप्त करत या सर्वांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. तर भिताडे अतुल ९२%, आगलावे तेजस व गायकवाड मयुरी ९१.५%, भोसले श्रीराज ९१%, माने निकिता ९०%, दहिवाळ वैष्णवी व मस्के उज्वला यांनी ८९.५% गुण मिळवत संस्थेमधील ५३ विद्यार्थ्यांनी ए प्लस व १४ विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त करत विशेष प्राविण्य संपादन केले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत शासकीय, निम-शासकीय विभागातील लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी-टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिट या विषयांचे कोर्सेस चालविले जात असून वर्षातून दोन वेळेस या परीक्षा घेतल्या जातात व परीक्षा पास झालेले विद्यार्थी सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे आदी विभागातील लिपिक पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात.

डिसेंबर २०२४ मधील जीसीसी-टीबीसी (कॉम्प्युटर टायपिंग) परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ सर, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, ज्ञानदीप जवंजाळ सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उत्तुंग यश प्राप्त करत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!