समाजाच्या कल्याणासाठीच संताचे जगणे – राघवेंद्र देशपांडे महाराज
रौप्य महोत्सवी वाटचाल साधी बाब नाही - शंकर ब्रम्हे, किर्तनकार (पुणे)

श्रीपूर तालुका माळशिरस येथील हनुमान मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन, महाप्रसाद याचे केले होते आयोजन. आज सामाजिक जीवनात माणसांच्या जाणीवा बोथट होत असल्याचे चित्र दिसते . या मध्ये पूर्वीची आपली एकत्र व एक मेकां बद्दल ममत्व असणारी कुटूंब व्यवस्था लोप पावत आहे अशी विदारक समजिक स्थिती फक्त संतांनी केलेल्या उपदेशाचे पालन केल्यानेच सुधारू शकणार आहे. असे प्रतिपादन राधेवेंद्र देशपांडे महाराज यांनी केले .
श्रीपूर येथे श्रीराम भजनी मंडळाच्या माध्यमातून ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला . या महोत्सवात किर्तन करताना ते बोलत होते .धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी या जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अंभगा वर निरूपण करताना ते बोलत होते .
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज , संतश्रेष्ठ तुकाराम महाराज , यांच्या जीवना कडे पाहता प्रथम समाजाने त्यांची हेटाळणी केली, आतोनात त्रास दिला परंतू केवळ समाजाच्या कल्याणासाठी हे सर्व सोसून उलट पक्षी समाजाचे कल्याणासाठी प्रसंगी देहही झिझवला . आपल्या निरुपणात त्यांनी संत रामदास स्वामी , संत एकनाथ , संत गजानन महाराज , व संत गोंदवलेकर महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .तीन दिवसीय झालेल्या या सोहळ्यात श्रीराम मुळे , शंकर ब्रम्हे यांनीही किर्तन सेवा बजावली. महोत्सव साजरा करण्यासाठी हरिभाऊ कुलकर्णी , हरी वसेकर , तुकाराम केसकर, बापूराव मोकाशी , मिलिंद कुलकर्णी , धनंजय पाठक , बाळासाहेब पोळ संतोष जोशी, तुकाराम सुमंत यांनी परिश्रम घेतले .
रौप्य महोत्सवी वाटचाल साधी बाब नाही-शंकर ब्रम्हे , किर्तनकार ( पुणे )
सामाजीक अनास्थेच्या काळात समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन म्हणून किर्तन , प्रवचनाच्या माध्यमातून संताचे चरित्र समाजा पुढे आणणे महत्वाची बाब आहे हे ओळखून येथिल श्रीराम भक्त मंडळ अविरत पणे २५ वर्ष काम करीत आहे. ही सामान्य बाब नाही समाजाने ह्या कार्याची दखल घेवून हे काम पुढे नेटाने चालवणे ही गरजेची बाब आहे.- शंकर ब्रम्हे , किर्तनकार ( पुणे )