महाराष्ट्र

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर | भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज यांचा उपक्रम

३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला.

रक्तदान म्हणजेच गरजू रुग्णास वेळेवर मदत आणि सामाजिक बांधिलकी असा महनीय पुण्यव्रतीसंगम – रक्तदाते किशोर दत्तात्रय घोडके

अकलूज (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन मान्यता प्राप्त भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज यांचे वतीने शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी, अकलूज येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला.
या शिबिराचे उद्घाटन या शिबिराच्या निमित्ताने ४९ व्या वेळा रक्तदान करणारे मा.श्री. किशोर घोडके यांच्या शुभहस्ते तसेच रक्तदाते प्रमोद इनामदार त्यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने संपन्न झाले.
किशोर घोडके यांनी उपस्थितांना संबोधित करताना मी आज या शिबिराच्या निमित्ताने ४९ व्या वेळा रक्तदान करताना गरजू रुग्णास वेळेवर रक्ताची मदत आणि त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपल्याचा अशा संगमाचाच जणू कुंभमेळ्यातील संगमावरील पवित्र स्नान केल्यासारखा मनस्वी आनंद घेत आहे असे सांगत रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णास वेळेवर रक्त उपलब्ध झाले तर त्याचा प्राण वाचू शकतो व रक्तदानासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीने वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी किशोर घोडके, प्रमोद इनामदार, करणराज घोडके, सीए नितीन कुदळे, श्रीमंत बर्वे, ज्ञानदीप जवंजाळ, आर्यन नागरगोजे, विजय शिंदे, सुरज साबळे, सुरज साळुंखे, करण खंडागळे, यश कदम, दर्शन उपाध्ये, अंकुश घुगे, योगीराज खुडे, सुरज दगडे, अभिजीत गायकवाड, आकाश मोरे, नागनाथ गोरड, वैभव देवकते, रोहित चव्हाण, ऋत्विक खंडागळे, विकास जाधव, ऋषीराज शिंदे, जय थोरात, अतुल थोरात, सौ. मंदा घोडके, काजल वळकुंडे, तृप्ती गायकवाड आणि प्रियांका चव्हाण यांनी रक्तदान करत सामाजिक कार्यास हातभार लावला.
याप्रसंगी रक्तपेढीचे इन्चार्ज डॉक्टर संतोष खडतरे आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी मार्गदर्शन केले तर रक्तपेढीचे काळे सिस्टर, अनिल लोखंडे आणि सहकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी अशोक साळुंखे, उमाजी भोसले, ओंकार भांडवले, सयाजी गायकवाड, शुभम बनपट्टे, ओंकार गोंदकर, विक्रम घोडके, दिलीप उकिरडे सर आणि इन्नुस मुलाणी सर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!