अशिक्षित लोकांप्रमाणेच काही सुशिक्षित लोक देखील अंधश्रद्धाळू आहेत-डॉ. विश्वनाथ पाटील
राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम

सुशिक्षित लोकांनाही श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांतील भेद कळत नाही – प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांची खंत
कोल्हापूर (प्रतिनिधी) “अशिक्षित लोकांप्रमाणेच काही सुशिक्षित लोक देखील अंधश्रद्धाळू आहेत.सुशिक्षित देखील देवाच्या नावाने कोंबड्या – बकऱ्यांचा बळी देतात.त्या मुक्या निरपराध जनावरांच्या गळ्यावरून सुरी फिरताना या निर्दयी लोकांना दया कशी काय येत नाही.असा सवाल करत प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी सुशिक्षित लोकांनाही श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांतील भेद कळत नाही.अशी खंत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केली.
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड.कॉलेज) येथे राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.एस.डी.रक्ताडे होते.या कार्यक्रमास यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. अध्यक्षीय मनोगतात विज्ञान थांबले की,अध्यात्म उदयास येते. अदृश्य शक्ती निसर्गाचा समतोल राखते.असे मत प्रा.रक्ताडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. एस.जी.जाधव यांनी शास्त्रज्ञ सी. व्ही.रमण यांच्या वैज्ञानिक कार्याचे सिंहावलोकन केले. याप्रसंगी पुंडलिक पाटील, सौरभ झेंडे,मोनिका सर्जेराव निकम – पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा.ए.जी.लोकरे यांनी आभार मानले.