शिवसेना युवा सेनेच्या मागणीला यश | डांबरीकरण करण्यास सुरुवात
संगम-शेवरे येथील रोडचे डांबरीकरण करण्यास सुरुवात

माळीनगर (प्रतिनिधी) शिवसेना युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेवरे येथे ७ जानेवारी २०२५ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. गेली अनेक वर्ष रस्त्याचे काम अपूर्ण होते. मेघा कंपनीचे प्रोजेकक्ट मॅनेजर प्रसाद साहेब यांनी दीड महिन्यात डांबरीकरण करून देतो असे लेखी आश्वासन दिल्या नंतरच शिवसेनेने रस्ता रोको आंदोलन स्थगीत केले होते.यामध्ये टेभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जी पाटील यांनी देखील लाख मोलाचे सहकार्य केले.
संगम-शेवरे गावातील ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले यातूनच आज डांबरीकरणाचे काम चालू झाले आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी मेघा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रसाद साहेब यांचे विशेष आभार मानले.
यावेळी युवा सेना तालुका उपप्रमुख महादेव लोखंडे, राहुल क्षीरसागर, सुभाष पराडे,ओम पराडे, प्रशांत पराडे,विकास भोई, शुभम भोई,अविनाश भोई, आदित्य भोई,प्रवीण पराडे, मोनू इंगळे,लाव्हा पराडे आदी उपस्थित होते.