महाळुंग-श्रीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्मान आरोग्य शिबिर संपन्न
उपकेंद्र खंडाळी व उपकेंद्र मिरे येथे या आयुष्मान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीपूर प्रतिनिधी : महाळुंग-श्रीपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात (प्रा.आ. केंद्र, महाळुंग-श्रीपूर येथे) आयुष्मान आरोग्य शिबिर योजने अंतर्गत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गेले सात वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राबवला जातो. या कार्यक्रमासाठी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई चव्हाण व पैलवान अशोक चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचेतन घोडके व डॉ. शिल्पा राठोड यांनी वेगवेगळ्या आजारांविषयी उपस्थित नागरिकांना माहिती देऊन त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जागृती करण्यात आली.
या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, व्हजायनल पी एच व आयुष्यमान भारत कार्ड व महालॅब यांच्या मार्फत रक्त लघवी अशा रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच महाळुंग-श्रीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील उपकेंद्र खंडाळी व उपकेंद्र मिरे येथे या आयुष्मान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.