महाराष्ट्र

आरोग्य सेविका व महिला बचत गटांचे काम प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल

मीराबाई कलके यांना दिल्ली येथे ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित

कोरवली (ता.मोहोळ) येथील मीराबाई कलके यांना दिल्ली येथे ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) सोलापूर जिल्ह्यातील कोरवली (ता.मोहोळ) येथील मीराबाई कलके यांनी आरोग्य विभागात काम करत व महिलांचा बचत गटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल दिल्ली येथील ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते त्यांना आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरवली येथील मीराबाई कलके यांनी गेली १७ वर्ष अर्धवेळ आरोग्य सेविकेचे काम करीत आहेत. त्याच बरोबर सरकारी महिला बचत गटाचे हे काम करीत आहेत.महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत ५०० महिलांना एकत्र आणून ३६ बचत गट स्थापन करून त्यांना विविध व्यवसायासाठी अर्थिक कर्ज मिळवून देऊन त्यांना सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनविले आहे. बचत गटातील महिला विविध व्यवसाय करीत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
मीराबाई कलके यांनी आरोग्य सेविका व महिला बचत गटांचे काम प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल दिल्ली येथील ग्लोबल फाऊंडेशन यांनी घेऊन त्यांना महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सदन येथे ना.रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!