SCV SSC 1980 | श्री चंद्रशेखर विद्यालय,श्रीपूर | माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला
चंद्रशेखर विद्यालय,श्रीपूर | मेळाव्यात घेतला माजी विद्यार्थ्यांनी आनंद | जुन्या आठवणी झाल्या ताज्या

श्रीपूर – लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळा संपल्यावर तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी श्री चंद्रशेखर विद्यालय,श्रीपूर मध्ये झालेल्या इयत्ता दहावी बॅच 1980 माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 45 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणीनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.
शाळेची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपूर व परिसरातील सुप्रसिद्ध डॉ.सुधीर पोफळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यमान शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांनी भूषविले होते. यावेळी अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेमधील त्या काळातले किस्से सांगितले. या कार्यक्रमासाठी स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले व मेळावा यशस्वी करून दाखवला
दुपारी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. भोजन झाल्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत गीत संगीत, मिमिक्री, विनोद, डॉयलॉग, नृत्य सादर केले. त्यामुळे अनेकांना 45 वर्षांपूर्वीचाच अनुभव आला. तर बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील प्रसंग, शिक्षकांची काढलेली खोड, मित्र मैत्रिणींच्या आठवणी यावेळी ताज्या करून दिल्या. त्यामुळे आजचा दिवस हा कसा संपला याचे भान माजी विद्यार्थ्यांना राहिले नाही.