महाराष्ट्र

शेतीला जोड व्यवसाय निर्माण व्हावा, यासाठी दुध व्यवसायाची निर्मिती – शिवामृत दुध संघ

शंकरराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिवामृत दुध संघास प्रकल्प भेट 

अकलूज (केदार लोहकरे) अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित विजयनगर- अकलूज या ठिकाणी प्रकल्प भेट दिली.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए.भाग ३ प्रात्यक्षिक पेपर अंतर्गत भूगोल विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प भेट अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रकल्प भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी शिवामृत बगीचा,रोपवाटिका तसेच शिवामृत दूध संघाची पाहणी केली. 

ग्रामीण भागातील शेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिले जाते. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शेतीला जोड व्यवसाय निर्माण व्हावा.यासाठी दुध व्यवसायाची निर्मिती केली.या उद्योगाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक चलन प्राप्त होत असून प्रत्येक शेतकरी या उद्योगाकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहत आहे.या दुध व्यवसाय उद्योगामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत झाली आहे.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे हरितक्रांती,औद्योगिक क्रांती झाली आहे.त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यात धवलक्रांतीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाल्याचे दिसून येते.माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुध या संघास उपलब्ध होते.या दुधावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते व त्यापासून बनवण्यात येणारे उपपदार्थ बासुंदी,पेढा,ताक, दही,मसाला दूध,बर्फी,कुल्फी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते.याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर त्याची पॅकिंग, सिलिंग व मार्केटिंग प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते याचीही माहिती देण्यात आली.हा प्रकल्प पाहत असताना तसेच दुग्धजन्य पदार्थांची माहिती घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देखील समाधानकारकरीत्या देण्यात आली.

या संपूर्ण संघाची माहिती देण्यासाठी आंम्हाला सहकार्य केलेले दूध संघाचे व्यवस्थापकीय  संचालक माने पाटील,दूध संघाच्या एच.आर.शेख मॅडम तसेच संपूर्ण दूध संघाची व दुग्धजन्य पदार्थांची माहिती देणाऱ्या घाडगे मॅडम यांचे सहकार्य लाभले.

या प्रकल्प भेटीसाठी आम्हाला शिवामृत दूध संघ पाहण्यास परवानगी देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के.टिळेकर तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉ.संतोष गुजर या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले.या प्रकल्प भेटी अंतर्गत भूगोल विभागातील २८ विद्यार्थी व २ प्राध्यापक सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!