महाराष्ट्र

अकलूज मध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना मिळाली मोठी बाजारपेठ 

अकलूज येथे नवतेजस्विनी तालुकास्तरीय विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ

बचत गटातील उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार – आमदार  राम सातपुते

अकलूज दि.१५ (केदार लोहकरे) अकलूज येथे महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उदयम विकास प्रकल्पांतर्गत  सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर व विठाई लोकसंचलित साधन केंद्र अंतर्गत तालुकास्तरीय विक्री आणि प्रदर्शनाचे उदघाट्न  आमदार राम विठ्ठल सातपुते व आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या  शुभहस्ते करण्यात आले.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. आमदार  रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्थानिक महिलांना सदर प्रदर्शनासाठी शुभेच्छा देऊन बचत  गटातील उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपायोजनाबाबत सूचना करण्यात आली.आमदार  राम विठ्ठल सातपुते यांनी बचत गटातील  उत्पादित वस्तू बाबत योग्य प्लॅटफॉर्म असावे याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याबाबतचे सांगितले.

विठाई लोकसंचलीत साधन केंद्रामार्फत आयसीआयसीआय बँकेमार्फत 94 लाख 24 हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्रामार्फत बचत गटातील महिलांना बँक ऑफ इंडिया मार्फत 1 कोटी 20 लाख रु उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक  सोमनाथ लामगुंडे  यांनी महिलांना बचत गटाची चळवळ व बचत गटाचे फायदे याची माहिती दिली.

सदरचे प्रदर्शन हे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या ठिकाणी चालू राहणार असून यामध्ये सर्व नागरिकांनी  प्रदर्शनाचा लाभ घेऊन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याबाबत बचत गटाकडून आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक CMRC व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी तर आभार माविमचे तालुका व्यवस्थापक रणजित शेंडे यांनी मानले. उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस अंतर्गत सर्व कर्मचारी व कार्यकारणी मंडळ यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!