“माझं संपूर्ण जीवन बदलणारे | मामाचं स्थान घेतलेले दादा !”- कै.जालिंदर नाईकनवरे (मामा)
दादा माझ्या जिवनातून वजा केले तर मी कोणीच नाही - बी टी शिवशरण

सख्ख्या मामा पेक्षा माझ्यावर प्रेम संस्कार व माया लावणारे जालिंदर नाईकनवरे (दादा) – बी टी शिवशरण
माणूस जुन्या आठवणी संस्कार प्रेम माया या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत असताना भुतकाळातील ते दिवस ती माणसं जिवाला जीव देणारी व आयुष्यात आनंद निर्माण करणारी आठवली की मन भरून येते खरोखरच ते दिवस त्या आठवणी ते चैतन्याने आपुलकी जिव्हाळा व एकमेकांच्या प्रेमात बुडालेली मोठ्या दिलदार मनाची मोकळ्या स्वभावाची होती हे माझ्या सारख्या चे परमभाग्याचा अविस्मरणीय ठेवा आहे हे नमूद करतो जालिंदर नाईकनवरे हे माझे मामा पांडुरंग आठवले यांचा वर्गमित्र त्या दोघांची इतकी घनिष्ठ मैत्री की ते एकमेकांशिवाय राहू शकत नसायचे जालिंदर नाईकनवरे यांना आम्ही भावंडे दादा म्हणायचो आमच्या आईने ही त्यांना तिचा भाऊ पांडुरंग आठवले इतकीच माया लावली होती त्यामुळे रक्षाबंधन भाऊबीज हे सण दादा यांना सोडून कधी झाल्याचं आठवत नाही दादा आमच्या आई ला अक्का म्हणायचे दादा आमच्या घरीच कायम असायचे ते त्यांचे आईवडील मुंडफणे मळ्यात रहायला होते दादांचं आईवडील दर शुक्रवारी बोरगाव येथील बाजाराला जायचे जाताना आमच्या घरी तास अर्धा तास आमच्या आई बरोबर बसून चहा पाणी घेऊन जायचे येताना बजार करून पुन्हा आमच्या घरी यायचे येताना मला माझा लहान भाऊ विलास याला गरम भजी शेवचिवडा गोडी शेव आणायचे आम्हाला पुढं बसवून खाऊ घालायचे पुन्हा ते चालत मुंडफणे मळ्यात जायचे हे दर शुक्रवारी नित्य नियमाने अनेक वर्षे चालू होते दादा आमच्या अक्का ला घरातील सर्व कामे करु लागायचे पाणी द्यायचे भाजी आणायचे आम्ही शाळेत नव्हतो त्यावेळी दादा आम्हाला शाळेतील गाणी कविता छान छान गोष्टी सांगायचे एक ते शंभर अंक जोरात म्हणायला शिकवायचे चुकले की दादा जोरात ओरडायचे पुन्हा चुकला तर पाठीत धपाटा मारीन म्हणायचे जुलै महिन्यात नागपंचमी सण असायचा तेव्हा दादा आम्हाला घेऊन शेती महामंडळाच्या मोकळ्या रानात पतंग वावड्या उडवायला मदत करायचे आम्ही भाऊ पाच सहा वर्षाचे असू बैलपोळा सण असायचा त्याच्या आदल्या दिवशी दादा आम्हाला घेऊन रानात न्यायचे पाटी मध्ये रानातील माती भरून घरी घेऊन यायचो दादा चिखल करायचे व मातीचे चार बैल तयार करायचे व आम्हा दोघा भावांना द्यायचे महाळुंग ची यमाई देवी यात्रेत दादा गर्दीत माझा हात धरून व लहान भावाला खांद्यावर घेऊन जत्रेत फिरवायचे खेळणी घ्यायचे जत्रेत ऊसाचा रस गारेगार द्यायचे काय दिवस होते किती आपुलकी जिव्हाळा आदर होता दादांच्या सहवासात माझं माझ्या लहान भावाचे बालपण घडले जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्रीपूरला यायचा आता इतकी गर्दी भव्यता नव्हती पण त्या पालखी सोहळ्यात दादा आम्हाला हात धरून पालखी सोहळा फिरुन दाखवत पोंगा पिपाणी घेऊन देत त्यावेळी लहान मुलांना पालखीत कपाळाला पिवळा गंध व त्यावर चमकी लावली जायची आम्हालाही दादा कपाळावर गंध लावून देत दादा आमच्या बरोबर लहानात लहान मोठ्यात मोठे होऊन मिसळून वागत त्यावेळी श्रीपूर मध्ये तीन टुरिंग टॉकीज असत मराठी चित्रपट बघायला लोक जात तेव्हा दादांना हट्ट करून आम्हीही चित्रपट बघायला जायचो पण अर्धा तासात आम्ही चित्रपट पहात पहात झोपी जायचो तो संपल्यावर दादा आम्हाला हाका मारून उठवत डोक धरून गदागदा हलवत व पुर्ण जागे झाल्याचे खात्री झाल्यावर आम्हाला घरी घेऊन येत श्री चंद्रशेखर विद्यालयात पाहिलीत आमची नाव दादा व आमचे मामा यांनी घातली आहेत दादा आमच्या बरोबर गोटया विटी दांडू खेळत रबरी लगोर करून झाडांवर बसलेल्या पक्षांना नेम धरून हुसकावून लावायला शिकवत लहानपणी च्या व दादांच्या सहवासात आठवणीत अनेक प्रसंग घटना आठवणी आहेत सर्वात स्मरणात राहिलेली आठवण अशी की मी संपादक झालो त्यावेळी श्री चंद्रशेखर विद्यालयात मुख्याध्यापक बा ह जाधव सर यांनी माझा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी सत्कार झाल्यावर दादा जाधव सरांना म्हणाले सर तुम्ही जो सत्कार केला आहे तो कोण आहे माहीत आहे का बी टी शिवशरण हा माझा भाचा आहे तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते दादा हे आमच्या साठी सख्ख्या मामा पेक्षा मला जवळचा मित्र मामा आमचा सोबती जिवलग हक्काचा दादा म्हणून त्यांनी जे माझ्या आयुष्यात अंतःकरणात स्थान निर्माण केले आहे ते कायम मरेपर्यंत असणार आहे मला जे सर्व बाळकडू व संस्काराचे धडे दिले ते दादांनी मी पत्रकार म्हणून जरी घडलो असलो तरी यांतील जे काही आहे ते दादांच्या सहवासात आम्ही घडलो धडपडलो ते सर्व श्रेय मी दादांना देतो दादा माझ्या जिवनातून वजा केले तर मी कोणीच नाही किंवा माझे अस्तित्व ते काय दादांच्या आठवणींना नतमस्तक होऊन थांबतो.