ग्रामीण

महाळुंग मध्ये अपघात हुंडाई (venue) गाडीचा पुढचा भाग झाला चुरा | Mahalung Accident

पालखी महामार्गावरती अपघात सत्र सुरूच | MH 45 AU 6938 | अपुर्‍या कामामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात

महाळुंग मध्ये अपघात हुंडाई कंपनीची (venue) वेणीव गाडीचा पुढचा भाग झाला चुरा

महाळुंग तालुका माळशिरस येथून जाणाऱ्या 965 G संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती मोठा अपघात घडलेला आहे. हुंडाई कंपनीची वेणू चार चाकीगाडी पालखी महामार्गावरील अपुऱ्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लाईटच्या ट्रान्सफार्मर वरती जाऊन आदळली आहे. गाडी समोरून चक्काचूर  झालेली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. 

या गाडीमध्ये सांगोला तालुक्यातील कोळागावा मधील  पाच प्रवासी होते.  तीन प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तात्काळ स्थानिकांनी लाईटचा ट्रांसफार्मर बंद केल्यामुळे व प्रवाशांना बाहेर काढून स्थानिक दवाखान्यामध्ये नेऊन प्रथम उपचार करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार  सांगोला तालुक्यातील दहा ते बारा एलआयसी काम करणारे अधिकारी कर्मचारी मनाली या ठिकाणी दहा दिवसांपूर्वी फिरण्यासाठी गेले होते. रात्री दिल्लीहून पहाटे पुण्याच्या दिशेने विमानाने प्रवास करून पुणे एअरपोर्ट वरती सर्व प्रवासी सकाळी सात वाजता पोहोचले.  त्या ठिकाणी तीन फोर व्हीलर गाड्या त्यांनी पार्किंग केल्या होत्या. दुपारचे जेवण रस्त्यामध्येच उरकून ते सर्वजण आपल्या घरी सांगोल्याच्या दिशेने येत असताना इंदापूर-माळीनगर मार्गे महाळुंग मधील डांगे वस्ती या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान  घराकडे जात असताना रस्त्याचे काम अपुरे राहिल्यामुळे,  डाव्या साईडची एक लेन्थचे काम  पूर्ण नसल्यामुळे  सदर गाडी  बाजूच्या लाईटच्या ट्रान्सफर वरती जाऊन आदळली आणि भला मोठा अपघात घडला आहे. 

एकंदरीत गेले तीन वर्षापासून या ठिकाणी पालखी महामार्गाचे काम अपुरे राहिल्यामुळे आणि वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे अशा प्रकारचे अनेक अपघात  महाळुंग मधील डांगे वस्ती या ठिकाणी होत आहेत. 

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर माळीनगर महाळुंग श्रीपूर  तोंडले-बोंडले मार्गे पंढरपूरच्या दिशेने जातो. परंतु माळीनगर महाळुंग श्रीपूर तोंडले बोंडले पर्यंत अनेक ठिकाणी या महामार्गाची कामे अपुरी असल्यामुळे या रोडवरती अनेक अपघात होत आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये एकाला जीव गमवावा लागला आहे.

18 तारखेला पालखीचे प्रस्थान होणार आहे आणि 2 जून रोजी लाखोच्या संख्येने वारकरी आणि त्यांचे वाहने याच महामार्गावरून प्रवास करणार आहेत.  वेळेत हे काम पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना वारकऱ्यांना या ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागणार आहे असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!