का होत आहेत पालखी महामार्गावर अपघात ? | अपुरी कामे | तर, टोल नाका का सुरू? |
माळीनगर-महाळुंग-श्रीपूर- बोरगाव-माळखांबी-तोंडले-बोंडले पर्यंत कामे अपुरी

का होत आहेत पालखी महामार्गावर अपघात ? | माळीनगर-महाळुंग-श्रीपूर- बोरगाव-माळखांबी-तोंडले-बोंडले पर्यंत कामे अपुरी | तर, टोल नाका का सुरू? | नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

नॅशनल हायवे 965 जी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर बावडा सराटी माळीनगर महाळुंग श्रीपूर बोरगाव माळखांबी तोंडले बोंडले असा पंढरपूरच्या दिशेने गेलेला आहे. संबंधित हद्दीमध्ये गेले तीन ते चार वर्षापासून याचे काम सुरू आहे. अद्याप दर्जेदार काम झालेले दिसत नाही. परंतु अर्धी कामे, रस्त्याच्या कडेला खडीचे व मुरमाचे ढिग मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा आहेत. व्यवस्थित काम न केल्यामुळे, आवश्यक ठिकाणी गतिरोधक नाहीत, कामाचा दर्जा ढासळलेला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत, सर्व्हिस रोडला गटारी नाहीत, दुतर्फा आवश्यक ठिकाणी लाईट नाहीत, साईट गार्ड नाहीत, दिशादर्शक बोर्ड व स्पीड लिमिटचे बोर्ड चुकीच्या ठिकाणी चुकीचे लावले आहेत. काही बोर्ड वाऱ्याने कोसळले आहेत, उड्डाण पुलाच्या बाजूला आणि खाली अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडला गतिरोधक नाहीत. माळीनगर-महाळुंग-श्रीपूर- बोरगाव- माळखांबी-तोंडले-बोंडले पर्यंत कामे अपुरी असल्यामुळे वरील ठिकाणच्या हद्दीमध्ये स्थानिक आणि नवीन प्रवाशांचे जास्त अपघात होताना पाहावयास मिळत आहे, अधुरे काम, असून सराटी येथील याच महामार्गावरील टोल नाका सुरू आहे. अपुरी कामे असली तरी टोल नाका कसा काय सुरू केला आहे असा नेटकर यांनी प्रश्न सोशल मीडियावरती विचारला आहे.

तर दुसरी बाजू पाहिली तर गाडी चालवताना अनेकांच्या वेगाला मर्यादा नाहीत. हाय स्पीडने गाड्या चालविल्या जात आहेत. रस्ता नवीन व चांगला असल्यामुळे शंभर पेक्षा जास्त स्पीडने गाड्या चालवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी वळण भागात अपघात होत आहेत. लहान मुले, ट्रिपल सीट, गाडी चालविताना मोबाईल वरती बोलणे असे वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

18 आणि 19 तारखेला पालखीचे प्रस्थान होणार आहे. 2 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगाव मुक्कामी आहे. 2 तारखेला सकाळपासूनच या महामार्गावरून लाखोच्या संख्येने वारकरी आणि त्यांची वाहने जाणार आहेत. संबंधित विभागाने तात्काळ या ठिकाणची अपुरी कामे पूर्ण करावीत. कामे दर्जेदार होऊन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करण्यात यावा. आणि प्रवाशांचे जीव वाचवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.



