डॉ.यशवंत कुलकर्णी (MD) यांना “इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड” | PSSK | Shreepur
डॉ.यशवंत कुलकर्णी यांना STAI चा इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड जाहीर

डॉ.यशवंत कुलकर्णी यांना STAI चा इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड जाहीर | श्रीपूर | पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान! |
पांडुरंग साखर कारखान्याचा गौरव!
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.
साखर उद्योगातील उत्कृष्ट नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि गुणवत्ता नियंत्रण यासाठी दिला जाणारा “इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड” यंदा द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) यांच्या वतीने डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. यामुळे डॉ.यशवंत कुलकर्णी (MD) आणि कारखान्याच्या कार्यपद्धतीस आणि व्यवस्थापनास देशपातळीवर सर्वोत्कृष्ट नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि गुणवत्ता नियंत्रण मान्यता मिळाली आहे.
STAI ही संस्था संपूर्ण देशभरातील साखर तंत्रज्ञान व उद्योगातील गुणवत्ता, सुरक्षितता, आणि नवकल्पनांचा पुरस्कार करणारी अग्रगण्य संस्था आहे. त्यांच्या परीक्षक मंडळाकडून संपूर्ण देशभरातून आलेल्या विविध साखर कारखान्यांच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करण्यात आला. या सर्व मूल्यांकन प्रक्रियेतून श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व आणि सुरक्षितता धोरण इतरांपेक्षा सरस ठरले. म्हणून कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.
डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या सर्वोत्कृष्ट नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि गुणवत्ता कारखान्यात उत्पादन कार्यक्षमते सोबतच, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर जागरूकता, वेळेवर प्रशिक्षण आणि आधुनिक यंत्रणा यामुळे गेल्या काही वर्षांपासून कारखान्यात कोणताही मोठा अपघात घडलेला नाही. हीच कामगिरी या सन्मानासाठी कारणीभूत ठरली.
या पुरस्कारामुळे कारखान्याची आणि डॉ.यशवंत कुलकर्णी यांची राज्य व देशपातळी वरती मान उंचावली आहे. या पुरस्कारामुळे संपूर्ण संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग आणि शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून सोशल मीडियावरती डॉ.यशवंत कुलकर्णी यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.