कै.प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त १८७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
जनसेवा कामगार संघटना शाखेचे उद्घाटन

लोकनेते कै.प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त अकलूज शहरात विविध उपक्रमाने साजरी
अकलूज (केदार लोहकरे)
लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वतीने अकलूज येथे गोळीबार चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरात १८७ रक्तदान दात्यांनी रक्तदान केले. यावेळी जनसेवा संघटनेचे सतीश पालकर, सुधीर रास्ते, अण्णासाहेब इनामदार, राजाभाऊ गुळवे, विठ्ठल इंगळे, बापू मगर, नवनाथ साठे,मयूर माने,ज्योती कुंभार, संजय गाडे, राहुल शहाणे,प्रताप कोकिळ, सागर साळुंखे, अरुण शहाणे, पिंटू वैद्य, शेखर शेंडे, अनिल सोनार, रघुनाथ साठे आदी उपस्थित होते.
जुने पोलीस स्टेशन येथे जनसेवा कामगार संघटना शाखेचे उद्घाटन डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत हणवते, आप्पा अवघडे, गोविंद पवार, रोहिदास हनवते, साधू खंडागळे, किशोर साठे, दत्ता काळोखे, अनिल बनपट्टे, दीपक लोंढे उपस्थित होते. तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे गरोदर महिलांना सुकवडा डिंकवडा वाटप करण्यात आले. तसेच सदभाऊ चौक येथे धवलसिंह रिक्षा स्टॉप यांच्यावतीने प्रतिमा पूजन तसेच जिलेबी व केळी वाटप करण्यात आले. यावेळी तात्या गुळवे, किशोर चव्हाण, गंगाधर माने साखळकर, रणजीत सुसलादे, चंद्रकांत कोळी, शिवदत्त नामदास, हतीश चंद्र पंडित, आसिफ काझी, नागेश सोनवणे, मच्छिंद्र पगारे, गौरव बाबर, महादेव जगताप, मनोहर कोळी, नितीन नाटेकर, देविदास जाधव ,अभि भारती आदी उपस्थित होते.