अनुभव संपन्न पोलीस निरीक्षक अधिकारी अकलूज मध्ये | Niraj Ubale PI | Akluj Police Station
प्रभावी नेतृत्वाची नवी सुरुवात -Niraj Ubale PI

निरज उबाळे यांनी अकलूज पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला
पोलीस यंत्रणा, सज्ज शांततेचे वचन, वारीच्या पार्श्वभूमीवर निरज उबाळे यांचा कायदा सुव्यवस्थेवर भर
अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे)
अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले, “संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन काही दिवसात माळशिरस तालुक्यात होत आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.”
निरज उबाळे यांनी पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. त्यामध्ये गुन्हे अन्वेषण आणि भ्रष्टाचार विरोधी कारवाईचा व्यापक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पुणे व मुंबई येथे अँटी करप्शन ब्युरो आणि क्राईम ब्रँचसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये काम पाहिले असून, सांगली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारीने पार पाडली आहे.
“वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असून, कुठल्याही प्रकारचा अनुचित घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. तसेच नागरिकांनी पोलीस खात्यास सहकार्य करावे,” असे आवाहन उबाळे यांनी यावेळी केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काळात पोलीस यंत्रणा अधिक कार्यरत राहणार असून, शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस विभाग सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.- नूतन पोलीस निरीक्षक-नीरज उबाळे,अकलूज पोलीस स्टेशन
संपादक- दत्ता नाईकनवरे,इन महाराष्ट्र आणि द डेली लाईफ 9421075931