श्रीपूर | श्री चंद्रशेखर विद्यालयात वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न | SCV
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा जागर: श्रीपूरच्या विद्यालयात उपक्रम

संपादक : इन महाराष्ट्र (दत्ता नाईकनवरे)
श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर येथे आज गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व वृक्ष संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. यंदा नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याचा टप्पा गाठल्याने, या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंत दोन्ही बाजूला वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेवक प्रकाश नवगिरे, नगरसेविका तेजश्री लाटे, संदीप घाडगे, दत्ता दोरगे, दत्ता नाईकनवरे, पालक संघाचे पदाधिकारी, प्राचार्य पांडुरंग बनसोडे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वृक्ष हे निसर्गाचा श्वास आहेत, आणि वृक्षारोपण म्हणजे त्या श्वासाला नवी ऊर्जा देण्याचा संकल्प. वाढती लोकसंख्या, जंगलतोड व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. झाडे कार्बन डाय ऑक्साइड शोषून ऑक्सिजन देतात, पावसाचे प्रमाण वाढवतात, आणि मातीची धूप थांबवतात. त्यामुळे प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे. असे आवाहन हनुमंत मोरे सर यांनी केले.
“झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश रुजवण्यासाठी आणि पर्यावरण संवेदना जागवण्यासाठी या उपक्रमाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना हनुमंत मोरे सर, सुधाकर कांबळे सर व सागर पाटील सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी संयुक्तपणे साकारली.