आज सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळणार | श्रीपूर-महाळुंग योजनांचे महाशिबिर
श्रीपूर-महाळुंग | शासन आपल्या दारी | मंडल मधील सर्व गावे | मिळणार सर्व दाखले व इतर सुविधा एकाच ठिकाणी

ठिकाण-गणेश हॉल ,श्रीपूर | सोमवार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून
श्रीपूर-महाळुंग, मिरे, उंबरे वे., नेवरे, कोंढरपट्टा, जांभूड, माळखांबी, बोरगाव, माळेवाडी बो., माळखांबी, विठ्ठलवाडी, खळवे. गावातील सर्व गरजू विद्यार्थी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा महाळुंग मंडल अधिकारी-एस.के. खंडागळे
📰 महसूल सप्ताहानिमित्त महाळुंग मंडळात शिवराज्याच्या धर्तीवर योजनांचा महाशिबीर
✍️ इन महाराष्ट्र न्यूज | संपादक दत्ता नाईकनवरे – श्रीपूर
महाळुंग मंडळातील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि उपयुक्त उपक्रम घेऊन महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. सोमवार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून, श्रीपूर येथील गणेश हॉल येथे महसूल सप्ताहाच्या निमित्ताने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे.
या शिबीरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागवार सेवा केंद्र उपलब्ध असणार आहेत. गावातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ अधिकारी, महाळुंग यांनी केले आहे.
🔹 सदर शिबीरामध्ये पुढील विभागांमार्फत सेवा पुरवण्यात येणार आहेत –
🔸 महसूल विभाग (महा-ई-सेवा)
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवास / अधिवास दाखला
- नॉन क्रिमीलेअर दाखला
- अँग्रीस्टँक नोंदणी
- ई-केवायसी (DBT साठी)
- आधार दुरुस्ती सेवा
🔸 BLO (मतदार नोंदणी विभाग)
- मतदार यादीमध्ये नवीन नाव नोंदणी
- नावात बदल/दुरुस्ती
- नाव वगळणे
🔸 पुरवठा विभाग
- नवीन शिधापत्रिका
- विभक्त शिधापत्रिका
- रेशन कार्डातील नाव समावेश / वगळणे
- नवीन RC क्रमांक
🔸 ग्राम महसूल अधिकारी
- ऑनलाईन १५५ दुरुस्ती
- ७/१२, ८ अ फेरफार वाटप
- ई-पिक पाहणी
- नैसर्गिक आपत्तीतील लाभार्थ्यांची ई-केवायसी
🔸 कृषी विभाग
- पीएम किसान योजनेशी संबंधित तक्रारींचे निवारण
- विविध कृषी योजनांची माहिती व अर्ज स्वीकार
🔸 ग्रामविकास विभाग
- ग्रामीण योजनांची माहिती देणे व अर्ज स्वीकार
🔸 आरोग्य विभाग
- महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर
🔸 पशुवैद्यकीय विभाग
- पशुधनाशी संबंधित योजना, माहिती व अर्ज स्वीकार
🔸 महावितरण विभाग
- नवीन वीज कनेक्शन
- डीपी दुरुस्ती व नवीन डीपीसाठी अर्ज स्वीकारणे
📍 ही एकदिवसीय मोहीम असून, नागरिकांनी आपले आवश्यक कागदपत्रांसह शिबीरात उपस्थित राहून थेट सेवांचा लाभ घ्यावा.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांना विविध कार्यालयांचे चकरा न मारता एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार आहेत, ज्यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे.
📢 “शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार नागरिकाभिमुख सेवा पोहोचविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
🖊️ – प्रतिनिधी, इन महाराष्ट्र न्यूज