राहुल साठे मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन
निबंध-चित्रकलेत विद्यार्थ्यांनी मांडला अण्णाभाऊंचा वारसा

सविस्तर बातमी – इन महाराष्ट्र न्यूज पोर्टल
संपादक – दत्ता नाईकनवरे
वेळापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा
वेळापूर (ता. माळशिरस) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, वेळापूर येथे निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाचे आयोजन राहुल साठे मित्र मंडळ वेळापूर यांच्या वतीने करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास महादेव देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष अमृतसिंह माने देशमुख, जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व शिवसेना तालुका उपप्रमुख सुनील साठे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत स्वप्नाली बापू साठे (इ. ७ वी) प्रथम, समीक्षा अशोक वाघमारे (इ. २ री) द्वितीय, अल्फिया अजमेर मुजावर (इ. ६ वी) तृतीय, तर चित्रकला स्पर्धेत जानवी सोमनाथ माने (इ. १ ली) प्रथम, अनुष्का अमोल मंडले द्वितीय, सुश्मिता गमा पाडवी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी काकासाहेब जाधव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्य व जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला (मंत्रालय महसूल सहाय्यक) किरण सकट, भाजप नेते पिनू येडगे, लालासाहेब मगर, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. श्रीकर देशपांडे, संजय आडत, सतीश साठे, अभिजीत साठे, निलेश नाईकनवरे, अक्षय बनसोडे, हर्षद साठे, रोमन वाघमारे, सुरज गायकवाड, रामदास साठे, अतुल जाधव, पिनू लोखंडे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल साठे मित्र मंडळ वेळापूर यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.