मा.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम
जागर माय मराठीचा, खेळ स्पर्धा व समाजसेवा – प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा

मा. आ. श्री प्रशांतराव परिचारक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रम
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्याकडून समाजोपयोगी आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत “जागर माय मराठीचा” या गीत-नृत्य आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. त्याचबरोबर विविध क्रीडा प्रकारांचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले. सांघिक खेळांमध्ये हॉलीबॉल, रस्सीखेच, क्रिकेट यांचा समावेश होता, तर वैयक्तिक खेळांमध्ये बॅडमिंटन व बुद्धिबळ या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक जबाबदारीचा प्रत्यय देत, कारखान्याने मातोश्री वृद्धाश्रम आणि मूकबधिर शाळांना स्नेहभोजन तसेच आर्थिक मदत पुरवली. त्यामुळे वाढदिवस हा केवळ साजरा न होता, समाजोपयोगी कार्यातून अर्थपूर्ण बनवण्यात आला.
कार्यक्रमाच्या औचित्याने कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी यांच्या हस्ते मा. आ. श्री प्रशांतराव परिचारक मालक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
दरम्यान, शेतकरी भवन येथे आयोजित सांघिक आणि वैयक्तिक खेळांच्या स्पर्धांचे उद्घाटन कारखान्याचे शासकीय लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांच्या हस्ते, चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे उद्दिष्ट केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नसून, एकता, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक जाणीव आणि समाजसेवा यांचा संगम घडवणे हे असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.