श्रीपूर-महाळुंगची ऋतुजा जाधव ठरली जिल्हा वेटलिफ्टिंग स्पर्धेची विजेती
श्रीपूरच्या क्रीडांगणाचा अभिमान – ऋतुजा जाधवची जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंगमधील कामगिरी गाजली

श्रीपूर ऋतुजा जाधव, विभागीय स्पर्धेसाठी निवड
श्रीपूर प्रतिनिधी
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा शहाजी जाधव हिने जिल्हास्तरीय वजन उचलणे (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी अकलूज येथे पार पडली. ऋतुजाने एकूण १२५ किलो वजन उचलून आपली ताकद दाखवली आणि जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आता पुणे, राजगुरुनगर येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या यशाबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा सौ. शुभांगीताई देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य यशराज देशमुख, प्राचार्य पांडुरंग बनसोडे सर, उपप्राचार्य सुनील गवळी सर, पर्यवेक्षक सिताराम गुरव सर, संस्था मान्य पर्यवेक्षक शेंडे सर, तसेच मार्गदर्शक धाराव सर व शेख सर, सर्व क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऋतुजाचे मन:पूर्वक अभिनंदन केले.