
अकलूज प्रतिनिधी | दिनांक : 09 सप्टेंबर 2025
अकलूज म.रा.प.महामंडळ अकलुज आगारातील वाहक मारुती बबन माने (वय 41, रा. माळीनगर, ता. माळशिरस) यांच्यावर दोन इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मारुती माने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अकलूज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी माहितीनुसार, फिर्यादी मारुती माने हे मागील 13 वर्षांपासून अकलूज आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 09 सप्टेंबर रोजी दुपारी 1.45 वाजता ते बस क्र. MH14 BT 1544 ने अकलूज येथून नेवरेकडे गेले होते. फेरी करून परत आल्यानंतर दुपारी 3.45 च्या सुमारास त्यांनी बस नवीन बस रुट डेपोट अकलूज येथे उभी केली. त्यानंतर गणवेशात असताना शासकीय कर्तव्य बजावत नियंत्रण कक्षाकडे जात असताना अज्ञात दोन इसमांनी त्यांना अडवले.
या दरम्यान दोघे आरोपी रा.श्रीपूर-बोरगाव हद्दीमधील यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर हातातील कड्याने डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केले. मारहाणीत माने यांच्या तिकीट काढण्याच्या मशीनचे नुकसान झाले असून तिकीट रकमेतील ₹360 शिल्लक राहीले, तर उरलेली रक्कम हरवली आहे.
त्यावेळी संतोष शिंदे व तुकाराम भोसले यांनी भांडण सोडवले. घटनेनंतर मारुती माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्राथमिक उपचारांनंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवर भारतीय न्याय संहिता कलम 1322, 121(1)3, 3524, व 3(5)3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास अकलूज पोलीस करीत आहेत.