महाराष्ट्र

पांडुरंग कारखान्याचे ऊस भूषण व आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर | PSSK

“ऊस भूषण” पुरस्कार विजेते जाहीर – श्रीपूरात सभासद शेतकऱ्यांचा गौरव

सभासद शेतकऱ्यांचा सहपत्नीक सत्कार – 20 सप्टेंबर रोजी वार्षिक सभेत वितरण सोहळा


( संपादक-दत्ता नाईकनवरे-इन महाराष्ट्र न्यूज पोर्टल) : 
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे आदर्श शेतकरी व ऊस भूषण शेतकरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या संकल्पनेतून व कारखान्याचे चेअरमन मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या “पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार” योजनेचे विजेते शेतकरी जाहीर करण्यात आले आहेत. गळीत हंगाम 2017-18 पासून सुरू झालेली ही योजना जमिनीची सुपीकता टिकवून ठेवून, अधिक साखर उताऱ्याच्या ऊस उत्पादनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना गौरविते.

गळीत हंगाम 2024-25 साठी “पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार” श्री.सोमनाथ नवनाथ मोरे (गाव पळशी, गट भाळवणी) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1,01,111 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे असून विजेत्यांचा सहपत्नीक गौरव करण्यात येणार आहे.

याशिवाय कारखान्याच्या सात गटातून प्रत्येकी एक शेतकऱ्याला “पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 25,111 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे आहे.

गळीत हंगाम 2024-25 चे आदर्श शेतकरी विजेते पुढीलप्रमाणे :

  1. श्री शिवाजी श्रीमंत रोंगे– खर्डी, पंढरपूर 
  2. श्री सौदागर दिगंबर कदम – रोपळे, देगांव 
  3. श्री रामचंद्र उत्तम गायकवाड – चळे(विभागून) 
  4. श्री अनिल हणमंत शिंदे –  मुंढेवाडी-चळे(विभागून) 
  5. श्री शुक्राचार्य खंडू गवळी – भाळवणी 
  6. श्री विजय बापू पाटील – आव्हे, भोसे 
  7. श्री विजय अंगद जाधव – सांगवी, करकंब 

पुरस्कार वितरण समारंभ कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत होणार आहे.

मा. आ. प्रशांत परिचारक (चेअरमन) म्हणाले –“मोठे मालक सुधाकरपंत परिचारक यांनी दाखवलेल्या हरितक्रांती व शेतकरी सबलीकरणाच्या वाटेवर कारखाना चालत आहे. ऊस भूषण पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.”

कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले –“स्पर्धा सुरु होऊन आज सात वर्षे झाली आहेत. कारखान्याचे सभासद शेतकरी नाविन्यपूर्ण ऊस लागवड, जमिनीची सुपीकता जपणे, ठिबक सिंचन, हिरवळीची खते, माती परिक्षण अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत. जमिनीची सुपिकता वाढवणे ही काळाची गरज आहे. 100 गुणांच्या तपासणीनंतर सर्वोत्तम शेतकऱ्यांना हे पुरस्कार देण्यात येतात. या स्पर्धेतील सर्व सहभागी शेतकऱ्यांचे अभिनंदन. विजेत्यांना पुढील उत्पादनासाठी शुभेच्छा”

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!