कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त पांडुरंग कारखान्यात 35 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन
कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भव्य समारंभ

35 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते
श्रीपूर प्रतिनिधी :
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याच्या 35 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाने संपन्न झाला.
प्रथम कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्या जयंती निमित्त कारखान्यांमध्ये व परिसरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले.
या समारंभाचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन व जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक मालक, व्हाईस चेअरमन श्री. कैलास खुळे सर, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे साहेब, माजी व्हाईस चेअरमन दिलीपराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी युटोपियनचे चेअरमन उमेशजी परिचारक मालक, कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, खातेप्रमुख, अधिकारी व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी पारंपरिक धार्मिक विधीनुसार सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक सौ. व श्री. भगवान चौगुले साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली.
समारंभाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आज कारखाना अधिक सक्षम व प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे समाधान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.