श्रीपूरच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे सहशिक्षक प्रा.अमोल बंडगर ठरले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक
प्रा.अमोल बंडगर सरांचे कार्य उजळले – राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

प्रा.अमोल बंडगर सरांचे कार्य उजळले – राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
पुणे : संपादक – दत्ता नाईकनवरे इन महाराष्ट्र न्यूज
मानाचा पुरस्कार :
या भव्य सोहळ्यात श्री आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट माळशिरस संचलित श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील ज्युनियर कॉलेज विभागातील जीवशास्त्र विषयाचे सहशिक्षक श्री अमोल बाळासाहेब बंडगर सर यांना “महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025” हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.तसेच त्यांचा सहपत्नी गौरव करण्यात आला.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 हा मानाचा सोहळा पुणे शहरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी क्षण ठरला.
प्रमुख पाहुणे व मान्यवरांची उपस्थिती :
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नंदकुमार रामहरी गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन, पुणे हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष उठाव मिळाला. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय काशीद, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री भरत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री संजय खटके, राष्ट्रीय सचिव श्री विशाल निकम, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री सचिन बेर्डे, भारतीय शिक्षक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री नादिल शेख आणि शिक्षक भारती संघटना ज्युनियर कॉलेज सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री शाहू बाबर सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी योगदान :
बंडगर सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. बंडगर सरांचा विद्यार्थ्यांच्या ट्युशनपासून चा प्रवास,सहशिक्षक ते आज प्राध्यापकपर्यंत पोहोचला. ज्ञानाच्या वाटेवरून वंचित राहू पाहणाऱ्या मुलांना त्यांनी केवळ शिक्षणाशी जोडले नाही तर त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला.
कार्यक्रमातील गौरवक्षण :
राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री भरत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या क्षणी संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला आणि वातावरण भावनिक व अभिमानास्पद झाले. एक शिक्षक आपल्या कार्यातून किती मोठा बदल घडवू शकतो याची साक्ष या क्षणाने दिली.
अभिनंदनाचा वर्षाव :
या मानाच्या सन्मानानंतर बंडगर सरांवर सर्वत्रून अभिनंदनाचा वर्षाव झाला. सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ असतो” याचे मूर्तिमंत उदाहरण बंडगर सरांनी घालून दिले आहे.
शुभेच्छांचा संदेश :
सेट परीक्षेचा निकाल लागल्यापासून सरांवरती सोशल मीडियावरती अभिनंदन मेसेजचा वर्षाव होत आहे. सरांचे अनेक संस्था कडून, विद्यार्थी, पावणे, मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन पर सत्कार देखील करण्यात येत आहेत. “सर, आपल्या पुढील वाटचालीत असेच अनेक मानाचे तुरे आपल्या कर्तृत्वाच्या शिरपेचात रोवले जावोत,” अशी सर्वांनी मनापासून प्रार्थना केली. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून, ग्रामीण भागातील सर्व शिक्षकांच्या कार्याला मिळालेला सन्मान आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.