
श्रीपूर तालुका माळशिरस : श्रीपूर नगरीचे निर्माते कै चंद्रशेखर आगाशे यांचे सुपुत्र कै.जगदीश उर्फ पंडीतराव आगाशे यांच्या स्मृति जपण्यासाठी श्रीपूर मधील सामाजिक कार्यकर्ते अल्लाबक्ष शेख यांनी ‘जगदीश मोफत पाणपोई’ गेले 42 वर्षापासूनची परंपरा अल्लाबक्ष शेख यांनी अखंडीत ठेवली आहे. उन्हाळ्याचे दिवस आले की, श्रीपूर छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये या पाणपोईचा शुभारंभ केला जातो. आज अकलूजचे माजी सरपंच शिवतेसिंह-मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
42 वर्षांपूर्वी मातीच्या माठात पाणी ठेवून ही पाणपोई सुरू केले होती. मध्यंतरी मोठे पाण्याचे रांजण आणि आता शुद्ध थंडगार आरोचे पाणी, अशा प्रकारे या पाणपोई मध्ये त्यांनी बदल देखील केले.. श्रीपूर ही पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हजारोच्या संख्येने अनेक लोक या ठिकाणी येत जात असतात, आणि उन्हाळ्यामध्ये जत्रा, यात्रा, सण ,वार, उत्सव तसेच आपली कामे घेऊन श्रीपूर चौका मधून ये जा करत असतात. चौकात या पाणपोईकडे लक्ष गेले की, वाटसरू पाणी पिण्यासाठी या ठिकाणी विसावा घेत असतात. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा अखंडित ठेवून खऱ्या अर्थाने तहानलेल्या ची तहान अल्लाबक्ष शेख सामाजिक कार्यकर्ते भागवताना दिसत आहेत.
या कार्यक्रमासाठी अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक व गटनेते नानासाहेब मुंडफणे, राजे ग्रुपचे अध्यक्ष बजरंग भोसले, सागर यादव, आरपीआय चे ज्येष्ठ नेते शामराव भोसले, रतनसिंह रजपूत, ब्रह्मदेव कदम, संजय मुंडफणे, लखन धुमाळ, मोहसीन पठाण, सतीश पवार, रमेश देवकर, रशीद मुलाणी, शैलेश साबळे, विकी लंगडे, अजिम मुलाणी, भाऊसाहेब कुलकर्णी, संस्थापक अल्लाबक्ष शेख, मोहसीन शेख, इमरान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या पुण्याच्या कामासाठी पाणपोईचे संस्थापक अल्लाबक्ष शेख यांना जनतेकडून अनेक शुभेच्छा दिल्या जातात.